म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राजस्थानमधील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांत मजबूत संवाद राहावा, याची मुख्यमंत्री पुरेपूर काळजी घेऊ लागले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी काँग्रेसनेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची भेट घेऊन ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली.

वाचा:

‘वर्षा’ बंगल्यावर शुक्रवारी या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. महिन्याभरापूर्वीच पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यकत्यांशी बोलताना, ‘हे आपले नाही तर शिवसेनेचे सरकार आहे’, असे विधान केले होते. त्यामुळे शुक्रवारच्या भेटीत चव्हाण यांची सरकारविषयी असलेली नाराजी दूर करण्यात आल्याचे कळते. माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या सूचनांवरही योग्य ती कार्यवाही करण्याची आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे कळते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलिकडेच एका मुलाखतीत, घटक पक्षांशी संवाद वाढविण्याचा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला होता. त्यातच राजस्थानमधील राजकीय घडामोडींनादेखील वेग आल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी सावध पवित्रा घेत सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

काँग्रेसच्या कुरबुरी सुरूच

करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वच सणांवर काही निर्बंध लावले आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने बकरी ईदनिमित्तानेही गर्दी होणार नाही याची काळजी घेत काही निर्बंध लादले आहेत. तसेच याबाबत गृह विभागाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार जनावरे खरेदी करताना ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्याची सूचना केली आहे. त्यावर काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी नाराजी व्यक्त करताना बकरी ही ऑनलाइन खरेदीची गोष्ट नसल्याचे मतही व्यक्त केले आहे. नसीम खान म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींसह राज्यातील सर्व दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. भाजी मार्केट, मांस मार्केटला परवानगी आहे, मग बकरा खरेदीला परवानगी का नाही? बकरा ही ऑनलाइन खरेदी करण्याची गोष्ट नाही. सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाचे अनेक मंत्री आणि आमदार आहेत. त्यांनीही योग्य पाठपुरावा करावा, असेही खान यांनी म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here