परभणी दौऱ्यावर असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले, “”पंतप्रधान मोदींनी आधी यांना राज्यातून बाहेर पाठवलं पाहिजे. मागेही अशी मागणी मी केली होती. आताही मोदींना हात जोडून विनंती करतो प्लीज प्लीज अशी व्यक्ती आम्हाला महाराष्ट्रात नको. महाराष्ट्र अशा गोष्टी सहन करणार नाही. किती दिवस आम्ही गप्प बसायचं?”

छत्रपती संभाजीराजे, भगतसिंह कोश्यारी आणि नरेंद्र मोदी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. तुलना करुनही ते थांबले नाहीत तर छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं म्हणत शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. संभाजीराजेंनी तर थेट त्यांना राज्यपालपदावरुन काढण्याची विनंतीच पंतप्रधान मोदींना केली आहे.
परभणी दौऱ्यावर असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी आधी यांना राज्यातून बाहेर पाठवलं पाहिजे. मागेही अशी मागणी मी केली होती. आताही मोदींना हात जोडून विनंती करतो प्लीज प्लीज अशी व्यक्ती आम्हाला महाराष्ट्रात नको. या महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज असतील, महापुरुष असतील, संत असतील. त्यांच्याविषयी इतके घाणेरडे विचार राज्यपालांच्या मनामध्ये येऊच कसे शकतात? मोदीजी तुम्ही यांना राज्यपाल म्हणून ठेवता तरी कसं? या व्यक्तीला महाराष्ट्रातून बाहेर काढावं. त्यांना कुठे ठेवायचे तिथे ठेवा”.
महाराष्ट्र अशा गोष्टी सहन करणार नाही. किती दिवस आम्ही गप्प बसायचं. शिवाजी महाराजांबद्दल ते पूर्वीही बोलले होते. महात्मा फुलेंबद्दल बोलले होते. इथे येऊन फक्त आमच्या महापुरुषांबद्दल गरळ ओकायची एवढा एकच अजेंडा राबवायचं ठरवलंय का?, असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी केला.
राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले होते??
“आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”