Panvel News : पनवेल मुंबई-गोवा महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत शुक्रवारी ऑडी एमएच.१४ जीए.९५८५ या क्रमांकाच्या गाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महामार्गावर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचे फार्महाऊस आहे. या फार्महाऊस लगत हा मृतदेह मागील दोन दिवसांपासून गाडीत होता.

मुंबई-गोवा रोडवर ऑडी कारमध्ये बॉडी सापडली होती त्याचे नाव संजय कारला असे असून त्याच्या छातीत चार गोळ्या मारल्याचे समोर आलं आहे. तसेच तो पुण्यातील गुन्हेगार असल्याचे सुद्धा समजले आहे. पुढील तपास तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.