नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येसाठी वापरलेले शस्त्र जंगलात शोधण्यासाठी दिल्ली पोलीस मेटल डिटेक्टरचा वापर करत आहेत. मात्र, काल शनिवारी दीड तास शोध घेऊनही पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर संबंधित शस्त्र जंगलात नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे त्यांनी शुक्रवारपासूनच जंगलात शोधमोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी पोलिसांना जंगलात काळ्या पॉलिथिन पिशवीत काही वस्तू सापडल्या आहेत. त्यात श्रद्धाचे काही अवयव असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र, तिचे डोके अजूनही सापडलेले नाही. शनिवारी पोलिसांना आफताबच्या दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील घरातून एक धारदार शस्त्र सापडले आहे. याच शस्त्राने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते का, हे तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

कुणालाही जमला नाही असा रेकॉर्ड आज सूर्यकुमार यादव करणार, भुवी-रिषभही विक्रमाच्या उंबरठ्यावर
त्या घरातील आफताब आणि श्रद्धाचे सर्व कपडे जप्त करण्यात आले असून तेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये १८ मे रोजी म्हणजे हत्येच्या दिवशी आफताब आणि श्रद्धाने घातलेल्या कपड्यांचा समावेश नाही. श्रद्धा फोन करून तिच्यावर ओढवलेल्या कठीण प्रसंगाबाबत सांगत असे त्या आफताबच्या ऑफिस सहकाऱ्याचीही चौकशी आता केली जाणार आहे.

पोलिसांना आत्तापर्यंत श्रद्धाच्या शरीराचे १३ अवयव सापडले असून, त्यातील बहुतेक हे हाडांचे अवशेष आहेत. उर्वरीत अवयव शोधण्यासाठी आफताबला दक्षिण दिल्लीतील विविध ठिकाणी नेले जात आहे. या प्रकरणातील पुरावे शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी महाराष्ट्र, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातही त्यांची पथके पाठवली आहेत.

गुन्ह्याच्या कारणाचा शोध

मुंबई सोडल्यानंतर आफताब आणि श्रद्धा यांनी हिमाचल प्रदेशसह अनेक ठिकाणी प्रवास केला होता. या प्रवासादरम्यानच त्यांच्यामध्ये असे काही घडले का, की ज्यामुळे तो श्रद्धाची हत्या करण्यास प्रवृत्त झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिस या ठिकाणांनाही भेट देत आहेत.

ठाकरे-आंबेडकर आज एकाच मंचावर; प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचे लोकार्पण

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here