मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
‘छत्रपतींनी माफी मागितली तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत जयजयकार का करतात? नौसेनेचे बोधचिन्ह दिलंय तर ते का दिलं आहे? औरंगजेब आणि अफजल खानाच्या कबरी फोडण्याची नाटकं का करत आहात तुम्ही? स्वाभिमानाचे तुणतुणे वाजवत भाजपबरोबर गेलात ना? आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? मुख्यमंत्री आणि ४० आमदार साधा निषेधही व्यक्त करु शकले नाहीत. भाजपनं छत्रपतींचा अपमान केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता. आम्ही मविआत गेलो आणि स्वाभिमान दुखावला म्हणून तुम्ही भाजप बरोबर गेलेत ना? इथे अधिकृतपणे भाजपनं आणि राज्यपालांनी अपमान केला आहे,’ असा हल्लाबोल करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
governor bhagatsingh koshyari, जोडे काय असतात आणि कसे मारले जातात हे दाखवून देऊ; संजय राऊतांचा राज्यपालांवर हल्लाबोल – shivsena leader sanjay raut slams governor bhagatsingh koshyari over his statement on chhatrapati shivaji maharaj
मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खरमरीत शब्दांत निशाणा साधला आहे. ‘राज्यपालांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतपणे केली पाहिजे, अन्यथा जोडे काय असतात आणि ते कसे मारले जातात? हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा राऊत यांनी दिला आहे.