नवी दिल्ली: पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन, पेन्शन वितरण प्राधिकरणांकडून म्हणजे पीडीएकडून मिळते, ज्यामध्ये बँका, पोस्ट ऑफिस आणि इतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पेन्शनधारकांना या पीडीएंना वैयक्तिकरित्या किंवा योग्य स्वरूपात जीवन प्रमाणपत्र द्यावे लागते. निवृत्तीवेतनधारक, त्यांचे आधार लिंक केलेले पेन्शन/बचत खाते कुठेही उघडले आहे याची पर्वा न करता, त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा भारतभरातील इतर कोणत्याही बँकेत सबमिट करू शकतात. निवृत्तीवेतन धारक हे काम ऑनलाइनही करू शकतात.

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! या निवृत्ती वेतनधारकांना मिळणार खास सूट
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जनरेट करण्यासाठी काय-काय महत्त्वाचे
१. पेन्शनधारकाकडे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे.
२. पेन्शनधारकाकडे मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
३. पेन्शन वितरण एजन्सीकडे (बँक पोस्ट ऑफिस इ.) आधार क्रमांकाची नोंदणी अगोदरच करावी.
४. बायोमेट्रिक उपकरणे.
५. इंटरनेट कनेक्टिव्हिटी.

पेन्शनधारकांना मोठा दिलासा! NPS चे पैसे मिळणे सोपे झाले, आता फक्त एकच करावं लागणार काम
बँकेत डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची प्रक्रिया
पंजाब नॅशनल बँकेच्या मते बँकेत डिजिटल जीवन प्रमाणपत्र कसे सादर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

१. निवृत्तीवेतनधारक डिजिटल जीवन प्रमाणपत्र जनरेट करण्यासाठी भारतभरातील आमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेला भेट देऊ शकतात. बँक स्तरावर डीएलसी यशस्वीपणे स्वीकारण्यासाठी आधार क्रमांक पेन्शन खात्याशी जोडला गेला पाहिजे.

२. पेन्शनधारकाला बँकेत आधार क्रमांक, नाव, मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर NIC द्वारे मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल, त्यानंतर पेन्शनधारकाला बायोमेट्रिक्स द्यावे लागतील.

पेन्शनधारकांनो, चेहरा स्कॅन करून जीवन प्रमाणपत्र कसे सबमिट कराल, वाचा संपूर्ण प्रकिया
३. पीपीओ क्रमांक, बँकेतील पेन्शन खाते, पेन्शन मंजूर करणार्‍या प्राधिकरणाचे नाव, पेन्शन वितरण प्राधिकरणाचे नाव यासारखी स्वयंघोषित पेन्शन संबंधित माहिती प्रदान करावी.

४. डिजिटल जीवन प्रमाणपत्र सबमिट केल्यानंतर लगेच NIC कडून एक पोचपावती एसएमएस पेन्शनधारकाला पाठवला जातो. पण DLC सादर केल्याच्या २-३ दिवसांच्या आत आमच्या बँकेद्वारे DLC प्रत्यक्ष स्वीकारणे किंवा नाकारणे यासंबंधीची पुष्टी एसएमएसद्वारे प्रदान केली जाईल.

बँक स्तरावर DLC नाकारण्याची कारणे
PNB वेबसाइटनुसार डिजिटल लाइफ सर्टिफिकेट नाकारण्याची २ कारणे असू शकतात.

१. निवृत्तीवेतनधारकाचा योग्य आधार क्रमांक PNB रेकॉर्डमध्ये अपडेट केला नसल्यास, DLC नाकारले जाईल

२. DLC सबमिट करताना निवृत्तीवेतनधारकाने चुकीचा खाते क्रमांक प्रदान केला असल्यास किंवा अधिकाऱ्यांनी प्रविष्ट केला असल्यास. तसेच बँकेत सादर केलेल्या डीएलसीवर प्रक्रिया केल्यानंतर, आमच्या बँकेकडून निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर २-३ कामकाजाच्या दिवसांत योग्य टिपण्णी किंवा तर्कासह एक पुष्टीकरण पाठवले जाते. DLC नाकारल्या गेल्यास पेन्शनधारकाने SMS मध्ये टिप्पणीद्वारे समस्येचे निराकरण करणे आणि त्याचे जीवन प्रमाणपत्र पुन्हा सादर करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here