मुंबई: शहरातील करोना रुग्णांची संख्या आणि मृतांच्या आकडेवारीवरून राजकीय नेत्यांमध्ये जुंपली आहे. अमेरिकेतील आघाडीचं दैनिक ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं दिलेल्या एका वृत्तावरून ही खडाजंगी सुरू झाली आहे. ()

वाचा:

महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या संख्येनं आता ३ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. रुग्णांच्या संख्येवरून विरोधी पक्षांनी नेहमीच सरकारवर टीका केली आहे. करोनाच्या चाचण्या पुरेशा होत नाहीत. रुग्णांची नेमकी संख्या आणि मृतांची आकडेवारी लपवली जाते, असा थेट आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं हे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत. ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील एका वृत्तानं महाराष्ट्र सरकारच्या या दाव्याला बळ मिळालं आहे.

भारतातील सर्व महानगरांपैकी केवळ मुंबई हे असं शहर आहे, जिथल्या करोना रुग्णांची खरी आणि पारदर्शक आकडेवारी प्रसिद्ध केली जात आहे, असं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलं आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील ही माहिती ट्विट केली आहे. आव्हाड याचं हे ट्विट म्हणजे सरकारवर आरोप करणाऱ्यांना दिलेलं अप्रत्यक्ष उत्तर असल्याचं मानलं जात आहे.

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी मात्र वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या या माहितीची खिल्ली उडवली आहे. ‘मुंबईत इतका सगळा गोंधळ असतानाही मुंबई महापालिका करोना रुग्णांचे खरे आकडे देते असं ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला वाटतं. ‘वॉशिंग्टन पोस्टच्या प्रतिनिधीला मुंबईतील करोनाच्या रुग्णांची आकडेवारी कशी मिळाली? ते कुणाशी बोलले की कुणाच्या फायद्यासाठी ‘टेबल स्टोरी’ केली?,’ असा प्रश्न नीतेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मुंबईकर भयंकर त्रासातून जात असताना असं वृत्त येणं हा विनोदच आहे. मुंबई महापालिकेनं करोना रुग्णांचे खरे आकडे प्रसिद्ध करावेत. मग पाहूच,’ असं आव्हानच नीतेश यांनी दिलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here