मुलींसोबत गैरवर्तन करणाऱ्या नराधम शिक्षकाचे नाव नामदेव पवार असं आहे. पीडित मुलींनी शिक्षक नामदेव पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपासून मुली शाळेत जात नव्हत्या. पालकांना आपल्या मुलींसोबत असं वर्तन झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पालकांनी हा प्रकार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला असता संभाजी ब्रिगेडकडून संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकांना जाब विचारण्यात आला आहे. तसेच संबंधित शिक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे दीपक केसरकर हे राज्याचे शिक्षण मंत्री आहेत. तसेच ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. शिक्षणमंत्रीच ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मुलींनी ज्या शिक्षकावर आरोप केले आहेत, त्या शिक्षकांना बडतर्फ करा अशी मागणी आता करण्यात येत आहे. जर आरोपी शिक्षकाला बडतर्फ करण्यात आले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.