मुंबई उपनगरातील मुलुंडमध्ये एका कार डिलरनं आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. ४२ वर्षीय कार डिलरनं त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. मयूर ठक्कर असं त्यांचं नाव आहे. मयूर यांच्या मित्राचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यामुळे मयूर यांना जबर धक्का बसला. तेव्हापासून ते तणावाखाली होते. घरी एकटे असताना त्यांनी गळफास लावून घेत जीवनप्रवास संपवला.

 

man suicide
मुंबई: मुंबई उपनगरातील मुलुंडमध्ये एका कार डिलरनं आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. ४२ वर्षीय कार डिलरनं त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. मयूर ठक्कर असं त्यांचं नाव आहे. मयूर यांच्या मित्राचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यामुळे मयूर यांना जबर धक्का बसला. तेव्हापासून ते तणावाखाली होते. घरी एकटे असताना त्यांनी गळफास लावून घेत जीवनप्रवास संपवला. पोलिसांनी मयूर यांच्या घराची झडती घेतली. त्यांच्या हाती काहीच संशयास्पद लागलं नाही. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली.

मयूर त्यांची पत्नी ज्योत्स्ना आणि मुलासह मुलुंडमध्ये वास्तव्यास होते. नव्या आणि सेकंड हँड कार विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. करोना काळात लॉकडाऊनमुळे त्यांचं बरंच नुकसान झालं. शुक्रवारी रात्री मयूर ठक्कर यांनी त्यांच्या मुलाला आत्येकडे पाठवलं. दुसऱ्या दिवशी मयूर यांच्या पत्नी सकाळी साडे सातच्या सुमारास घराबाहेर पडल्या. त्यावेळी मयूर ठक्कर झोपले होते. त्या साडे आठच्या सुमारास परतल्या. त्यांनी घराची बेल वाजवली. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
संतापलेल्या लेकानं वडिलांना निर्घृणपणे संपवलं; करवत आणली, आईच्या मदतीनं विल्हेवाट लावली
ज्योत्स्ना यांनी काही वेळ बेल वाजवली. मयूर झोपले असावेत असं त्यांना वाटलं. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या किल्लीच्या मदतीनं कुलूप उघडलं. आत गेल्यानंतर त्यांना मयूर यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. पतीचा मृतदेह पाहून ज्योत्स्ना यांनी आक्रोश केला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावले, अशी माहिती मुलुंड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं दिली. मयूर यांना तातडीनं एमटी अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
आफताबला भेटलेल्या ‘त्या’ तरुणींचं पुढे काय झालं? पोलिसांना वेगळीच शंका; टेन्शन वाढलं
मयूर यांचा जवळचा मित्र निलेश माळी यांचा १२ दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. निलेश यांच्या निधनाचा माझ्या पतीला धक्का बसला, असं ज्योत्स्ना यांनी पोलिसांना सांगितलं. निलेश यांच्या निधनानंतर मयूर तणावाखाली होते. त्यामुळेच त्यांनी जीवन संपवलं असावं, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. मयूर ठक्कर यांची घरात सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यांच्या कुटुंबियांनी तणावाशिवाय कोणतंच कारण सांगितलेलं नाही. प्राथमिक तपासात कोणताच घातपात आढळून आलेला नाही, असं मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कांतीलाल कोथिंबिरे यांनी सांगितलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here