नवी दिल्ली : रॅडिसन ब्लू हॉटेलचे मालक अमित जैन यांचा मृतदेह त्यांच्या सदनिकेत शनिवारी सकाळी संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. आत्महत्येची माहिती दिल्लीच्या मांडवली पोलीस ठाण्याला मिळाली खरी पण घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना कोणतीही नोट मृतदेहाशेजारी सापडली नाही. पोलिस त्यांच्या मृत्यूची कसून चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने त्यातून कसं बाहेर पडायचं, याची चिंता त्यांना सतावत होती. गेली अनेक महिने यावर त्यांचा विचार सुरु होता. पण त्यातून मार्ग न निघाल्याने त्यांनी अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

सकाळी साडे आठच्या सुमारास अमित अगदी नेहमी घरातून बाहेर पडतात तसे घराबाहेर पडले. कारमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे लहान भाऊही होते. अमित जैन यांनी आपल्या भावाला गाझियाबाद येथील कार्यालयात सोडले. नंतर मीटिंगला जातो, असं सांगून ते तेथून निघून गेले. दुपारी त्यांचा मुलगा आदित्य काही सामान घेण्यासाठी खेळगाव येथील फ्लॅटवर पोहोचला असता त्यांना वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मुलाने पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत मॅक्स हॉस्पिटल, पटपरगंज येथे नेलं गेलं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कोरोना काळात हॉटेल व्यवसाय अतिशय मंदीत होता. जगभरातील हॉटेल व्यवसायिक टेन्शनमध्ये होते. कोरोना काळात पर्यटन बंद असल्याने साहजिक पर्यटकांची रेलचेल नव्हती. अशा काळात घेतलेल्या कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे? घेतलेल्या कर्जाजी मुद्दल कशी फेडायची? असं असताना व्याज तर वाढत होतं… गेल्या अनेक महिन्यांपासून याच १०० कोटींच्या परताव्याची चिंता अमित जैन यांना सतावत होती. मात्र त्यांनी आपल्या डोक्यातील विचार कुटुंबियांना कळू दिला नाही.

रॅडिसन ब्लू हॉटेलच्या मालकाने उचललं टोकाचं पाऊल, भावाला ऑफिसला सोडलं अन् फ्लॅटवर येऊन…
सगळं व्यवस्थित सुरु आहे, असं कुटुंबियांना भासवलं. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या घराबाहेर पडले. यावेळी त्यांचा भाऊही त्यांच्या सोबत होता. त्याला अमित यांनी ऑफिसला सोडलं. मी मिटिंगला जातोय, मी निघतो… असं सांगून त्यांनी आपल्या फ्लॅटच्या जवळ गाडी पार्क केली. तिथून ते घरी पोहोचले. नंतर काहीच वेळात त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. नंतर त्यांचा मुलगा जेव्हा फ्लॅटवर पोहोचला, तेव्हा त्याला आपल्या बाबांचा मृतदेट टांगलेल्या अवस्थेत दिसला. त्याने तत्काळ पोलिसांना फोन लावून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांचा शवविच्छेदन अहवाल आज रविवारी दुपारी येणार आहे. ज्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here