मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी झालेल्या मिनी लिलावात सर्वच संघांनी अनेक खेळाडूंना रिलीज केलं. त्यांच्यासोबतचे करार संपुष्टात आणले. चेन्नई सुपर किंग्सनं नारायण जगदीशनला रिलीज केलं. आता जगदिशननं विजय हजारे करंडकात धावांची टाकसाळ उघडली आहे. सीएसकेनं बाहेरचा रस्ता दाखवलेल्या जगदिशननं हरियाणाविरोधात १२८ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या शतकाच्या जोरावर तमिळनाडूनं ७ बाद २८४ धावांचं आव्हान उभं केलं. प्रत्युत्तरादाखल हरियाणाला केवळ १३३ धावा करता आल्या. तमिळनाडूनं १५१ धावांनी विजय मिळवला.

हरयाणानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा विक्रम केला. मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जगदिशननं त्यांचा निर्णय चुकीचा ठरवला. साई सुदर्शनसोबत जगदिशननं १५१ धावांची सलामी दिली. सुदर्शननं ६७ धावांची खेळी केली. सुदर्शन बाद झाल्यानंतरही जगदिशननं फटकेबाजी सुरुच ठेवली. जगदिशनं स्पर्धेतील चौथं शतक झळकावलं. १२३ चेंडूंत त्यानं १२८ धावा काढल्या. त्यात प्रत्येकी ६ चौकार आणि षटकारांचा समावेश होता.
उर्वशी रौतेला – रिषभ पंतमध्ये नेमकं काय आहे नातं? क्रिकेटर शुभमन गिलने सगळंच सांगितलं
विजय हजारे करंडक स्पर्धेत तमिळनाडूच्या एन. जगदिशनची बॅट तळपली आहे. बिहारविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर झालेल्या चारही सामन्यांत जगदिशननं शतकं साजरी केली आहेत. २६ वर्षांच्या जगदिशननं १३० च्या सरासरीनं ५२२ धावा कुटल्या आहेत. आंध्र प्रदेशविरुद्ध नाबाद ११४, छत्तीसगडविरुद्ध १०७, गोव्याविरुद्ध १६८ आणि हरयाणाविरुद्ध १२८ धावा करत जगदिशननं शतकांचा चौकार लगावला आहे.
वर्ल्डकपमध्ये पराभव, मौनात गेलेल्या रोहित शर्माचं अखेर दर्शन, हिट मॅन नव्या युद्धासाठी तयार
कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

विजय हजारे करंडक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम यंदा मोडीत निघू शकतो. विराट कोहली, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल यांनी याआधी एका स्पर्धेच्या एका हंगामात चार शतकं झळकावली आहेत. जगदिशननं या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता त्याच्याकडे विक्रम मोडण्याची संधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here