shraddha death case: आफताबनं केलेल्या कृत्यानं संपूर्ण देश हादरला. समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये याची चर्चा झाली. या सगळ्याचा परिणाम श्रद्धाचं कुटुंब राहत असलेल्या वसईत पाहायला मिळत आहे. एका हिंदू-मुस्लिम जोडप्याला त्यांचं रिसेप्शन स्थगित करावं लागलं आहे.

 

shraddha 1
मुंबई: मूळची वसईची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येमुळे देश हादरला. २६ वर्षांच्या श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब पुनावालानं दिल्लीत हत्या केली. श्रद्धा-आफताब दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहत होते. जवळपास सहा महिन्यांनी श्रद्धाच्या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आफताबनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचं आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे.

आफताबनं केलेल्या कृत्यानं संपूर्ण देश हादरला. समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये याची चर्चा झाली. या सगळ्याचा परिणाम श्रद्धाचं कुटुंब राहत असलेल्या वसईत पाहायला मिळत आहे. एका हिंदू-मुस्लिम जोडप्याला त्यांचं रिसेप्शन स्थगित करावं लागलं आहे. वसईत वास्तव्यास असलेल्या २९ वर्षीय दिव्या आणि ३२ वर्षीय इम्रान यांच्या लग्नाचं रिसेप्शन आज संध्याकाळी होणार होतं. दोघेही एकमेकांना ११ वर्षांपासून ओळखतात. दोन्ही कुटुंबांनी संमती दिल्यानंतर दिव्या आणि इम्रान यांनी १७ नोव्हेंबरला कोर्टात लग्न केलं.
आफताबला भेटलेल्या ‘त्या’ तरुणींचं पुढे काय झालं? पोलिसांना वेगळीच शंका; टेन्शन वाढलं
वसई पश्चिमेला असलेल्या आनंद नगर येथील विश्वकर्मा हॉलमध्ये आज (२० नोव्हेंबर) संध्याकाळी ६.३० वाजता इम्रान आणि दिव्याचं रिसेप्शन होतं. त्यासाठी २०० जणांना आमंत्रण देण्यात आलं. दोघांच्या रिसेप्शनची आमंत्रण पत्रिका ट्विटरवर व्हायरल झाली. अनेकांना रिसेप्शनचा विषय श्रद्धा वालकरच्या हत्येशी जोडला. सोबत #लव्हजिहाद जोडलं.
आँख बंद टपली महागात पडली! मित्रांना रात्री खेळ सुरू केला अन् होत्याचं नव्हतं झालं
रिसेप्शनची पत्रिका पाहून स्थानिक पातळीवरील धार्मिक संघटना सक्रिय झाल्या. त्यांनी हॉलच्या मालकाशी संपर्क साधला. परिसरातील शांतता, सलोख बिघडू नये म्हणून रिसेप्शन रद्द करण्याची मागणी संघटनांनी केली. यानंतर जोडप्याच्या कुटुंबियांनी माणिकपुरी पोलीस ठाणं गाठलं. आम्ही रिसेप्शन सोहळा स्थगित करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. या लग्नाचा संबंध लव्ह जिहादशी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here