Crime News: केरळच्या वानयाडमध्ये चार वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्या प्रकरणातील आरोपी मुलाच्या वडिलांचा बिझनेस पार्टनर आहे. आरोपीनं दिवसाढवळ्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी चिमुरडा त्याच्या आईसोबत अंगणवाडीत जात होता. या हल्ल्यात मुलाची आई गंभीर जखमी झाली.

 

Untitled design (30)
वायनाड: केरळच्या वानयाडमध्ये चार वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्या प्रकरणातील आरोपी मुलाच्या वडिलांचा बिझनेस पार्टनर आहे. आरोपीनं दिवसाढवळ्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी चिमुरडा त्याच्या आईसोबत अंगणवाडीत जात होता. या हल्ल्यात मुलाची आई गंभीर जखमी झाली.

वायनाडमधील मेप्पडीमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेशनं (४५) शुक्रवारी सकाळी चिमुकल्यावर अतिशय निर्दयीपण हल्ला केला. आदी देव असं आरोपीचं नाव आहे. आदी देव त्याची आई अनितासोबत अंगणवाडीत जात होता. त्यावेळी जितेशनं माय लेकावर धारदार शस्त्रानं हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.
श्रद्धा प्रकरण ताजं असताना हायवेच्या शेजारी सापडली लाल सुटकेस; उघडताच परिसरात खळबळ
दोघांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलाच्या डाव्या कानाला आणि डोक्याला दुखापत झाली. त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला कोझिकोड येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शनिवारी सकाळी मुलानं अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आईची प्रकृती आता स्थिर आहे.
आँख बंद टपली महागात पडली! मित्रांना रात्री खेळ सुरू केला अन् होत्याचं नव्हतं झालं
आदी देवचे वडील जयप्रकाश आणि आरोपी जितेश यांच्यामध्ये व्यवसायावरून वाद होते. त्यामुळेच जितेशनं जयप्रकाशच्या पत्नी आणि मुलावर हल्ला केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासानंतरच हल्ल्यामागचं नेमकं कारण समजू शकेल, असं पोलीस म्हणाले. पोलिसांनी हल्ल्यानंतर लगेचच आरोपीला अटक केली. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here