youth in uttar pradesh mahoba end life: उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यात एका तरुणानं फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केली आहे. रेल्वे रुळांवर जाऊन तरुणानं जीव दिला. तरुणानं फेसबक पोस्टमध्ये आत्महत्येचा उल्लेख केला होता. काही महिन्यांपूर्वीच तरुणाचा विवाह झाला होता. तरुणाच्या आत्महत्येबद्दल समजताच गावावर शोककळा पसरली.

संजयची फेसबुक पोस्ट पाहून कुटुंबीय घाबरले. त्यांनी गावभर संजयचा शोध घेतला. मात्र संजयचा ठावठिकाणा सापडला नाही. तितक्यात एका तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडल्याचं त्यांना समजलं. संजयचा भाऊ विनोदनं मृतदेह सर्वप्रथम पाहिला. कपडे आणि अन्य साहित्य पाहून त्यानं मृतदेह संजयचाच असल्याचं ओळखलं.
दहा महिन्यांपूर्वी संजयचा विवाह झाला होता. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. संजयनं कुटुंबियांना कधीच कोणत्या त्रासाबद्दल सांगितलेलं नव्हतं. संजयच्या आत्महत्येबद्दल समजताच पत्नी आणि आई ओक्साबोक्सी रडू लागल्या. आत्महत्येआधी संजयनं फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. मी माझ्या आनंदासाठी आत्महत्या करत आहे. यात कोणाचाच दोष नाही. माझं कुटुंब आत्महत्येला जबाबदार नाही, असं संजयनं पोस्टमध्ये नमूद केलं होतं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.