वाचा:
जिल्ह्यात रविवारी सकाळी १३४ बाधितांची वाढ झाली. यामध्ये शहरातील १३, ग्रामीण भागातील २२ व्यक्तींसह सिटी पॉइंटवर केलेल्या तपासणीत १४, तर मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाने केलेल्या तपासणीत आढळून आलेल्या ८५ व्यक्तींचा बाधितांमध्ये समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १० हजार ५३८ झाली आहे. पैकी ५९८६ करोनामुक्त झाले आहेत, तर आतापर्यंत ३९२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ४१६० बाधितांवर उपचार सुरू आहेत.
महापालिका हद्दीत १३ बाधित
शहरातील बाधितामध्ये जालान नगर येथील १, अक्षदपुरा १, अल्ताफ कॉलनी, गारखेडा १, आंबेडकर नगर १, एन-नऊ सिडको १, खारा कुआँ १, श्रेयनगर १, हेली बाजार परिसर १, मुकुंदवाडी १, जवाहरनगर पोलिस ठाणे परिसर १, एन-१२, विवेकानंद नगर १, तर लक्ष्मी नगर, गारखेडा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
ग्रामीण भागात २२ बाधित
ग्रामीण भागातील बाधितांमध्ये पोखरी येथील १, एमआयडीसी परिसर, बजाज नगर १, सरस्वती सोसायटी, बजाज नगर १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, वडगाव १, बजाज नगर १, डोंगरगाव कावड १, बाभुळगाव २, आळंद, फुलंब्री २, शिक्षक कॉलनी, गोंदेगाव १, एन्ड्युरन्स कंपनी परिसर २, बोरगाव, गंगापूर १, विटावा, गंगापूर १, संत नगर, सिल्लोड १, जामा मशीद परिसर, सिल्लोड १, केळगाव, सिल्लोड १, टिळक नगर, सिल्लोड १, तर वैजापूर येथील २ व्यक्तींचा समावेश आहे.
सिटी पॉइंटवर १४ बाधित
सिटी पॉईंटवर आढळून आलेल्या बाधितांमध्ये शेंद्रा येथील ४, वाळूज २, बजाज नगर २, शिवाजी नगर ३, पडेगाव २, तर मिसारवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
पथकाच्या तपासणीत ८५ बाधित
मोबाइल स्वॅब कलेक्शन पथकाच्या (टास्क फोर्स) तपासणीत आढळून आलेल्या बाधितांमध्ये नाथ सुपर मार्केट परिसर, औरंगपुरा येथील २५, रिलायन्स मॉल परिसर, गारखेडा १, एन-१३ येथील १, एन-१३ येथील ७, रेल्वे स्टेशन परिसर २, भीम नगर १, पदमपुरा २, संभाजी कॉलनी १४, जाधववाडी ५, पुंडलिक नगर ५, राम नगर १४, राजा बाजार ३, कासलीवाल मार्व्हल पूर्व परिसर १, रेणुका नगर, तर शिवाजी नगर येथील ४ व्यक्तींचा समावेश आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times