पांडुरंग वाडकर असं या शिवसैनिकाचं नाव आहे. ते विद्यमान उपसरपंच आहेत. १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांचा स्मृतिदिन होता. या कन्येचा जन्मही १७ आक्टोबरला झाला हा योगायोग होता. तर मुलगी जन्माला यायच्या आदल्या दिवशी बाळासाहेब ठाकरे हे माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनीच आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेव असं सूचवलं आणि म्हणूनच मी माझ्या मुलीचं नाव शिवसेना असं ठेवले असं पांडुरंग वाडकर यांनी सांगितलं.
बाळासाहे ठाकरे हे माझे दैवत आहेत. तसेच मी आमदार भरतशेट गोगावले यांचा निष्टावंत कार्यकर्ता आहे आणि शिवसेना ही अखंड महाराष्ट्राची शिवसेना आहे. त्यामुळे मी माझ्या मुलीचे नाव शिवसेना असे ठेवले आहे. या नामकरण सोहळ्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवासेना कोअर कमिटीचे सदस्य विकासशेट गोगावले, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, उपविभाग प्रमुख गोपिनाथ सावंत, प्रविण मांडरे, सरपंच नारायण वाडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोळत असताना विकासशेट गोगावले यांनी पांडुरंग वाडकर यांनी मुलीचे नाव बाळासाहेबांची शिवसेना ठेवल्याचे सांगत त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. या वेळी उपस्थितांनी या लहानग्या शिवसेनेला पुढील वाटचाली साठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. तर जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज काळीजकर यांनी पांडूरंग वाडकर यांनी आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसेना हे नाव ठेवणे ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी असे म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाप्रमाणेच ही मुलगी आपले शिवसेना हे नाव मोठे करेल अशा शब्दात आशिर्वाद दिले.