खेड : लोटे येथील डिव्हाईन केमिकल्स कंपनीमधील स्फोटामध्ये भाजलेल्या आठ कामगारांपैकी संदीप गुप्ता पाठोपाठ शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री विपल्य मंडल या भाजलेल्या कामगाराचा मुंबई येथील ऐरोली नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या डिव्हाईन कंपनी प्राशासनाच्या भूमिकेबाबत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील डिव्हाईन कंपनीत झालेल्या स्पोटाच्या दुर्घटनेप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) आक्रमक झाली आहे. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांसह जखमी कामगारांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा रिपाईचे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांनी दिला आहे. (one more worker lost his life in divine chemicals company blast)

या स्फोटात आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर रिपाईचे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील पदाधीकाऱ्यानी दुर्घटनाग्रस्त कंपनीला भेट दिली. या भेटीदरम्यान मृत व जखमी कामगारांना न्याय देण्यासाठी रिपाईने पुढाकार घेतला आहे. मृत कामगारांसह जखमी कामगारांना जोपर्यंत योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही, असा इशारा सकपाळ यांनी दिला आहे. मृत व जखमी कामगारांना तातडीने मदत देण्याची मागणी करत ही बाब गांभर्याने न घेतल्यास आदोलन छेडण्याचा इशाराही सुशांत सकपाळ यांनी दिला आहे.

राहुल गांधींनी सोनियांना विचारले मी सुंदर दिसतो का?; सोनिया गांधी काय म्हणाल्या, पाहा
सहा कामगारांची मृत्यूशी झुंज सुरूच

या दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. अन्य सहा कामगार मृत्यूशी झुंज देत आहेत. डिव्हाईन केमिकलमध्ये रविवारी दि. १३ रोजी सकाळी झालेल्या स्फोटानंतर आठ कामगार होरपळले होते. त्यापैकी संदीप गुप्ता याचा दि. १४ रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. तर त्या पाठोपाठ त्याच रुग्णालयात विपल्य मंडल या आणखी एका कामगाराचा शुक्रवारी दि. १८ रोजी मृत्यू झाल्यामुळे या घटनेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. पण इतके दिवस होऊनही कंपनी प्राशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुलीचं नाव ठेवलं शिवसेना; स्वप्नात येऊन खुद्द बाळासाहेबांनीच नाव सुचवल्याचा शिवसैनिकाचा दावा
या सगळ्या प्रकरणी आता खेड पोलिसांनी या घटनेची चौकशी करून डिव्हाईन कंपनी प्रशासनावर कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. हे प्रकार गेल्या वर्षेभरात लोटे एमआयडीसीत अनेकदा घडू लागल्याने भितीचे वातावरण आहे.

गोमांस-मॉब लिंचिंग आणि अत्याचारींचा सत्कार, हे आमचे हिंदुत्व नाही: उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here