याचवेळी, शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का, असा बोचरा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा राज्यपालांचा उद्देश असेल, असे मला वाटत नाही’, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आ. प्रवीण दरेकर यांनी दिली. तर, ‘राज्यपालांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Home Maharashtra bhagat singh koshyari latest statement, राज्यपालांच्या वक्तव्याने गोंधळ; विरोधकांचा हल्लाबोल, तर सत्ताधाऱ्यांकडून...
bhagat singh koshyari latest statement, राज्यपालांच्या वक्तव्याने गोंधळ; विरोधकांचा हल्लाबोल, तर सत्ताधाऱ्यांकडून सारवासारव – maharashtra political news bhagat singh koshyari statement on chhatrapati shivaji maharaj
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोश्यारी यांच्यावर टीकेचा भडिमार करत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. तर, उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.