rahul gandhi yatra news, राहुल गांधी आज औरंगाबादेत, दुपारनंतर सुरतला असेल धावता दौरा – rahul gandhi bharat jodo yatra in aurangabad today and will go in surat in the afternoon
Rahul Gandhi Today Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. यासाठी ते आज औरंगाबादमध्ये असून यानंतर ते सूरतसाठी धावता दौरा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद : काँग्रेस नेते राहुल गांधी आज, सोमवारी (२१ नोव्हेंबर) औरंगाबादेत येत आहेत. सोमवारी रात्री त्यांचा औरंगाबादेत मुक्काम राहील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी सोमवारी दुपारी बारा वाजता हेलिकॉप्टरने जळगाव जामोद येथून औरंगाबाद विमानतळावर येतील. तेथून विमानाने सुरत येथे जातील.
गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गांधी यांचा सुरतला धावता दौरा असेल. सोमवारी सायंकाळी साडेसहाला ते औरंगाबादेत परततील. रात्री त्यांचा औरंगाबादेत मुक्काम असेल. ते मंगळवारी सकाळी सातला हेलिकॉप्टरने जळगाव जामोदकडे रवाना होतील. राहुल यांच्या स्वागतासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी साडेपाचला मुकुंदवाडी बस थांब्यावर उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी केले आहे. राज्यपालांच्या वक्तव्याने गोंधळ; विरोधकांचा हल्लाबोल, तर सत्ताधाऱ्यांकडून सारवासारव
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.