पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थविरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल चौकातून रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालत असताना अखिल ओमकार मित्र मंडळ गणेश मंदिरासमोर आरोपी आकाश व अनिकेत हे मेफेड्रॉन व चरसची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींची झडती घेऊन त्यांच्याकडून सुमारे दोन लाख १५ हजार रुपयांचे मेफेड्रॉन व चरस जप्त केले. त्यांच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.