मुंबई: परदेशी गुंतवणूकदार प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा भारतीय बाजारात पैसा ओतत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये त्यांचा हिस्सा वाढवला आहे. मार्केट रिसर्च कंपनी प्राइम डाटाबेसच्या आकडेवारीवरून विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) सप्टेंबर तिमाहीत केवळ १० कंपन्यांच्या समभागांमध्ये तब्बल १ लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे, असे दिसून आले. यामध्ये झोमॅटोसह टाटा स्टील, आयटीसी, बजाज फिनसर्व्हसह १० कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.

झुनझुनवालांनी या डझनभर कंपन्यांचे शेअर्स विकले, जाणून घ्या कुठे पैसे गुंतवले
FII ने गेल्या तिमाहीत एकूण ७६४ समभागांमध्ये गुंतवणूक केली. यापैकी सर्वाधिक पैसा त्यांनी टाटा स्टीलमध्ये गुंतवला. FII ने या मेटल स्टॉकमध्ये २४,८९८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची प्राइम डेटाबेसमधून ही माहिती मिळाली आहे. FII ने सप्टेंबर तिमाहीत धातू समभागांमध्ये २४४.४२ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. या तिमाहीत आतापर्यंत या समभागात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान! यंदा लिस्टींग झालेल्या IPOनी लाखो कोटी बुडवले
यानंतर, FII ने भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये २२ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली. परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे लावलेल्या शीर्ष १० समभागांवर एक नजर टाकूया. गेल्या महिनाभरापासून या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय आणखी वाढ अपेक्षित आहे पण सावधगिरीने गुंतवणूक करा कारण परदेशी गुंतवणूकदार कधीही विक्री सुरू करू शकतात.

अरे वाह्ह! ११ रुपयाचा शेअर ८८ हजारांवर; जाणून घ्या कुबेराचा खजिना ठरलेल्या या सर्वात महागड्या शेअरबद्दल
विदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर तिमाहीत या १० समभागांमध्ये सर्वाधिक पैसे गुंतवले
१. टाटा स्टील: विदेशी गुंतवणूकदारांनी जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत या स्टॉकमध्ये २४,८९८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
२. भारत इलेक्ट्रॉनिक्स: विदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर तिमाहीत २२,०१७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
३. बजाज फिनसर्व्ह: गुंतवणूकदारांनी सप्टेंबर तिमाहीत बजाज फिनसर्व्ह शेअर्समध्ये १५,६८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
४. मॅक्स हेल्थकेअर: चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये ९,६५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
५. भारती एअरटेल: गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये ८,८०७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
६. झोमॅटो: गुंतवणूकदारांनी सप्टेंबर तिमाहीत या स्टॉकमध्ये ८,०५७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
७. ICICI बँक: परदेशी गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये ७,६१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
८. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL): FII ने दुसऱ्या तिमाहीत या स्टॉकमध्ये ४,४९५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
९. गेल (GAIL): विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये ४,०१८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
१०. आयटीसी (ITC): एकेकाळी मीम स्टॉक म्हटल्या जाणाऱ्या आयटीसीच्या स्टॉकमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी ३,२५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here