ईशा अंबानीचे लग्न १२ डिसेंबर २०१८ रोजी पिरामल ग्रुपचे मालक अजय आणि स्वाती यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाले. अलीकडेच मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल व्यवसायाची कमान ईशा अंबानीकडे सोपवली आहे. त्यामुळे आता व्यवसाय सांभाळण्यासोबतच दोन मुलांची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल की ईशा अंबानीला शिक्षिका बनायचे होते, पण रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डात सामील झाल्यानंतर त्या व्यवसाय देखील चांगल्या प्रकारे हाताळत आहे.
इशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म, नाव जे त्यांच्या कुटुंबाला साजेल असंच…. पाहा नावाचा अर्थ
ईशा ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी वडिलांना रिलायन्सचा व्यवसाय हाताळण्यास मदत करण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांना रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या बोर्डात स्थान देण्यात आले. लक्षात घ्या २०२० मध्ये मुकेश अंबानी पहिल्यांदा आजोबा झाले, जेव्हा आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताने १० डिसेंबरला मुलाला जन्म दिला.
१६ व्या वर्षी इशाने जग गाजवले
ईशा अंबानीचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले जेव्हा वयाच्या १६व्या वर्षी तिचे नाव जगातील सर्वात तरुण अब्जाधीश वारसांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आले. ईशा अंबानीने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. अमेरिकेतील येल विद्यापीठातून मानसशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून MBA केले. सुरुवातीच्या काळात तिला शिक्षिका व्हायचे होते, पण आता रिलायन्स इंडस्ट्रीजचा रिटेल व्यवसाय सांभाळत आहे.
करिअरची सुरुवात नोकरीपासून, आता ८०० कोटींची मालकीण
ईशा अंबानीने अमेरिकेतील मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र, २०१४ मध्ये त्यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डात समावेश करण्यात आला. celebritynetworth.com नुसार, ईशा अंबानीची एकूण संपत्ती १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक म्हणजे सुमारे ८०० कोटी आहे. २-१५ मध्येच तिने आशियातील १२ सर्वात शक्तिशाली आगामी व्यावसायिक महिलांच्या यादीत स्थान मिळवले.
कोण आहेत आनंद पिरामल
आनंद पिरामल यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात बॅचलर पदवी घेतली आहे. तर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवसाय प्रशासनाची पदवी देखील घेतली आहे. आनंदने हार्वर्डमधून MBA शिक्षण पूर्ण आहे. आनंद हे भारतातील सर्वात प्रसिद्ध रिअल इस्टेट फर्मपैकी एक असलेल्या पिरामल रियल्टीचे संस्थापक आहेत. पिरामल रियल्टीच्या आधी आनंदने पिरामल स्वास्थ्य या ग्रामीण आरोग्य सेवा उपक्रमाची स्थापना केली, जी दररोज ४०,००० रूग्णांवर उपचार करते. आनंद हे पिरामल समूह, या बिझनेस ग्रुपचे कार्यकारी संचालक देखील आहेत.
पहिला मोठा प्रकल्प (प्रोजेक्ट)
रिलायन्स जिओ, हा ईशाचा पहिला मोठा प्रोजेक्ट होता. यानंतर त्यांनी रिलायन्सच्या रिटेल व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. AJIO एप्रिल २०१६ मध्ये ईशा अंबानीच्या देखरेखीखाली लॉन्च करण्यात आले, जे रिलायन्स ग्रुपचे मल्टी-ब्रँड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे.