पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीच्या प्रियेसिने चक्क प्रियकराच्या पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. खेड पोलिसांकडून आरोपी प्रियेसिला ताब्यात घेण्यात आले असून तिला २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोमल गणेश केदारी (वय २८ रा.साई साम्राज्य राजगुरूनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर स्वाती सुभाष रेंगडे (वय २१) असे खून केलेल्या प्रियेसीचे नाव आहे. हिस खेड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत कोमल हीचा पती गणेश केदारी आणि स्वाती रेंगडे यांचे काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्या दोघांमध्ये प्रियकराच्या पत्निवरून अनेकदा भांडणे होत होती. याचा राग प्रियेसीच्या मनात होता. बुधवार ( दि.१६) रोजी कोमलचा पती गणेश हा कंपनीत कामाला गेल्यावर कोमल घरात एकटी असताना अज्ञात व्यक्तीने घरात येऊन तिचा गळा आवळून खून केला.

चंद्रग्रहणापासून घरात सतत लागतेय आग, कुटुंबीय घाबरले; पोलिसांनाही रहस्य उलगडेना
याबाबत कोमलचा पती याने खेड पोलिसात खून झाल्याची तक्रार दिली होती. कोमलचे शवविचछेदन झाल्यानंतर तिचा गळा आवळून खून झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांना या गुन्ह्यातील संशयीत महिला स्वाती सुभाष रेंगडे हिला जुन्नरमधील ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुशंगाने विचारपुस केली मात्र ती उडवा उडविची उत्तरे देऊ लागली. त्यानंतर तिला काही गोष्टींची आश्वासने दिले. त्यानंतर तिने स्वता:च्या गुन्ह्याची कबुली दिली. प्रेमात अडथळा ठरतं असल्याने खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

मुंबईकरांनो सावधान! बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही गोवरची लागण, गंभीर आहेत लक्षणं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here