मुंबई: आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरला (Archean Chemical IPO) सोमवारी म्हणजेच २१ नोव्हेंबर २०२२ रोजी चांगली लिस्टिंग मिळाली आहे. आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Archean Chemical IPO) शेअर्स बीएसई वर ४४९ रुपये तर एनएसईवर ४५० रुपयांच्या किंमतीला सूचीबद्ध झाले आहेत. कंपनीने आयपीओ अंतर्गत ४०७ रुपयांची वरची किंमत निश्चित केली होती. म्हणजेच शेअर्सच्या लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर ४२ रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीचा आयपीओ ३२ पट सबस्क्राइब झाला होता.

दमदार कमाईची संधी; बँकिंग शेअरमध्ये मोठी तेजी, लक्षणीय परताव्याची शक्यता
दुसरीकडे, आर्कियन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्येही गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केटमध्ये आर्कियन केमिकल्सचे शेअर्स १२०-१३० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होते. यादरम्यान, कंपनीच्या शेअर्सची मजबूत यादी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

विदेशी गुंतवणूकदारांची कमाईची चाल; १० शेअर्सवर लाखो कोटी गुंतवले, तुमच्याकडे आहेत का?
३२.२३ पट सबस्क्राईब झाला
आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी उस्फुर्द प्रतिसाद दिला. ११ नोव्हेंबर रोजी बंद झालेल्या या १,४६२.३१ कोटी रुपयांच्या आयपीओला ३२.२३ पट अधिक बोली मिळाल्या. QIB साठी राखीव भाग ४८.९१ पट सबस्क्राईब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या भागाला ९.९६ पट बोली प्राप्त झाली. या इश्यूच्या अनलिस्टेड शेअर्सना गुंतवणूकदारांकडून तसेच ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत होता. आयपीओची इश्यू किंमत ३८६-४०७ रुपये होती.

BSE निर्देशांकात मोठा बदल; डॉ रेड्डीजचा स्टॉक सेन्सेक्समधून ‘आऊट’, टाटांच्या ऑटो कंपनीची एंट्री
ग्रे मार्केटमध्ये धमाल केली
आर्कियन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओचे समभाग सुरुवातीपासून ग्रे मार्केटमध्ये प्रीमियमवर ट्रेडिंग करत होते. गेल्या शुक्रवारी, इश्यूचे अनलिस्टेड शेअर्स ग्रे मार्केटमध्ये रु. ११२ (Archean Chemical IPO GMP) च्या प्रीमियमने ट्रेडिंग करत होते. यामुळे शेअर बाजारात आयपीओचे लिस्टिंग ५१९ रुपयांवर होणे अपेक्षित होते.

३८६ ते ४०७ रुपये प्राईस बँड निश्चित
आर्कियन केमिकलचा आयपीओ ९ नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज बाजारात उघडला आहे. हा १४६२ कोटी रुपयांचा आयपीओ असून ११ नोव्हेंबरपर्यंत सबस्क्राइबसाठी खुला होता. या आयपीओमध्ये, ६५७.३१ कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीसाठी ऑफर अंतर्गत असतील. हा शेअर ग्रे मार्केटमध्ये सुमारे ७० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करताना दिसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here