वेग मंदावला
एका वर्षात डिमॅट खाती वाढली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून वाढीचा वेग मंदावला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यापासून डिमॅट खात्यांमध्ये वाढीचा वेग सातत्याने कमी होत आहे. ऑगस्टमध्ये २६ लाख नवीन खाती उघडण्यात आली होती. तर सप्टेंबरमध्ये २० लाख आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये केवळ १८ लाखांवर हा आकडा आला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये ३६ लाख डिमॅट खाती उघडण्यात आली होती.
बाजारातील अस्थिरता
आशियातील पहिली आणि एकमेव सूचीबद्ध डिपॉझिटरी सीडीएसल (CDSL) नुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत ४८ लाखांहून अधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे सीईओ रूप भुत्रा यांनी सांगितले की, नवीन डिमॅट खाती कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक घटकांमुळे बाजारातील अस्थिरता आणि या कॅलेंडर वर्षातील बाजाराची कमकुवत कामगिरी.
रशिया-युक्रेन संघर्ष
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ गट उपाध्यक्ष (संशोधन-बँकिंग आणि विमा, संस्थात्मक इक्विटी) नितीन अग्रवाल म्हणाले की, रशिया-युक्रेन संघर्षामुळे बाजारातील अस्थिरता वाढल्याने जानेवारीपासून नवीन खाते उघडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याच वेळी ऑक्टोबरमध्ये नवीन खाती उघडण्याचा वेग कमी होण्याचे एक कारण म्हणजे या सणांच्या दरम्यान केवळ १८ कामकाजाचे दिवस होते. तर सप्टेंबरमध्ये कामकाजाच्या दिवसांची संख्या २२ होती.
वय १८ वर्षे असणे आवश्यक
१८ वर्षांवरील कोणीही डिमॅट आणि ट्रेडिंग खाते डिजिटल पद्धतीने उघडू शकतो. यासाठी पॅन, बँक खाते, ओळखीचा पुरावा आणि पत्ता ही अनिवार्य कागदपत्रे आहेत. प्रथम ब्रोकरच्या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर खाते उघडण्याचा फॉर्म भरा. यामध्ये तुम्हाला नाव, पत्ता, पॅन आणि डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याशी जोडले जाणारे बँक खाते यांचा तपशील भरावा लागेल. तसेच सर्वात योग्य ब्रोकरेज योजना निवडण्याची गरज आहे.