नवी दिल्ली:नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सोबत थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडर (TPAP) द्वारे चालवल्या जाणार्‍या युपीआय पेमेंट सेवेसाठी एकूण व्यवहार मर्यादा ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याच्या निर्णयावर चर्चा करत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एनपीसीआयने ३१ डिसेंबरची मुदत निश्चित केली आहे.

३० टक्के व्यवहार मर्यादा निश्चित करण्याचा प्रस्ताव
सध्या व्यवहाराची (ट्रान्सक्शन) मर्यादा (Volume Cap) नाही आहे. अशा परिस्थितीत गुगल पे आणि फोनपे, या दोन कंपन्यांचा बाजारातील हिस्सा जवळपास ८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये NPCI ने मक्तेदारीचा धोका टाळण्यासाठी TPAP साठी ३० टक्के व्यवहार मर्यादा निश्चित करण्याचा प्रस्ताव दिला होता.

युरोप फिरताना आता खर्च करणं सुलभ, UPI द्वारे पेमेंटचीही सुविधा
या संदर्भात सर्व बाबींचा सर्वंकष विचार करण्यासाठी बैठक बोलावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एनपीसीआयच्या अधिकार्‍यांव्यतिरिक्त, अर्थ मंत्रालय आणि आरबीआयचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते.

UPI vs UPI Lite: दैनंदिन व्यवहारांसाठी कोणता पर्याय फायद्याचा; जाणून घ्या दोघांमधील फरक, ट्रांझॅक्शन लिमिट
नोव्हेंबरच्या अखेरीस युपीआय मार्केट कॅपच्या अंमलबजावणीचा निर्णय शक्य
सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार सध्या NPCI सर्व शक्यतांचे मूल्यांकन करत आहे आणि ३१ डिसेंबरची मुदत वाढवण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. एनपीसीआयला उद्योगातील भागधारकांकडून मुदत वाढविण्याच्या विनंत्या मिळाल्या आहेत आणि त्यांची तपासणी केली जात आहे, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, NPCI या महिन्याच्या अखेरीस UPI मार्केट कॅप लागू करण्याबाबत निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

आता RuPay क्रेडिट कार्डवर बिनधास्त करता येणार पेमेंट, ग्राहकांसाठी आली आनंदाची बातमी
UPI म्हणजे काय
UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी मोबाईल ॲपद्वारे बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते. युपीआयद्वारे, एखादी व्यक्ती एक बँक खाते एकाधिक युपीआय ॲप्सशी लिंक करू शकते. त्याच वेळी, एका ॲपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात. विशेष म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, युपीआय आयडी यापैकी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफरची सुविधा देते.

भीम ॲपशी लिंक करू शकता रुपे क्रेडिट कार्ड
नुकतेच युपीआय सुविधेवर रुपे क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले आहे. आता तुम्ही शेजारच्या किराणा दुकानात युपीआय QR कोड स्कॅन करून क्रेडिट कार्डने पैसे भरण्यास सक्षम असाल. तथापि, RuPay क्रेडिट कार्डद्वारे, तुम्ही फक्त व्यापारी युपीआय QR कोडवर पेमेंट करू शकता. सध्या तुम्ही भीम (BHIM) ॲपवर काही बँकांचे रुपे क्रेडिट कार्ड लिंक करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here