“युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकप्रकारे देवाचे अवतार होते. मुठभर मावळ्यांना साथीला घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राला देवासमान असणाऱ्या शिवरायांबद्दल हे असे बोलूच कसे शकतात. अशी सगळी वक्तव्य ऐकल्यानंतर चीड येते, संताप येतो… यांनी लायकी आहे का शिवरायांवर बोलण्याची… यांची जीभ हासडली पाहिजे…”, अशा शब्दात उदयनराजेंनी आपला संताप व्यक्त केला.

 

Trivedi koshyari And udyanraje
सुधांश त्रिवेदी-उदयनराजे भोसले-राज्यपाल कोश्यारी
मुंबई : “ज्या लोकांची लायकी नाही आणि ज्यांना अक्कल नाही ते शिवाजी महाराजांविरोधात अशी वक्तव्ये करतात. खरं तर अशी वक्तव्ये ऐकल्यानंतर मला खूप संताप येतो, जीभ हासडली पाहिजे यांची….”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. अगोदर राजेशाही होती, लोकांना ती नको होती. लोकशाही आली, आता लोकशाहीतले राजे कसे वागतात, कसे बोलतात तुम्हीच पाहा… मी तर म्हणेन राजेशाही पुन्हा आली पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजीराजेंविरोधात केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे कार्यकर्ते आज राज्यातल्या विविध शहरांत आंदोलन करुन कोश्यारी-त्रिवेदींचा निषेध व्यक्त करत आहेत. काल फडणवीसांनी राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेदींची पाठराखण करत ते तसे बोललेच नाहीत, असं म्हणत त्यांची कड घेतली. यानंतर संभाजीराजेंनी फडणवीसांवर आसूड ओढत पाठराखण कसली करता, माफी मागायला लावा, असं म्हटलं. संभाजीराजेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. उदयराजेंनीही रोखठोक भूमिका घेत राज्यपाल आणि त्रिवेदींची अक्कल काढली.

“युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकप्रकारे देवाचे अवतार होते. मुठभर मावळ्यांना साथीला घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राला देवासमान असणाऱ्या शिवरायांबद्दल हे असे बोलूच कसे शकतात. अशी सगळी वक्तव्य ऐकल्यानंतर चीड येते, संताप येतो… यांनी लायकी आहे का शिवरायांवर बोलण्याची… यांची जीभ हासडली पाहिजे…”, अशा शब्दात उदयनराजेंनी आपला संताप व्यक्त केला. नालासोपाऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

संभाजीराजे काय म्हणाले?

राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रात ठेऊ नये. पंतप्रधान मोदी यांना वाटत असेल त्या राज्यात त्यांनी कोश्यारींना पाठवावं. पण त्यांना लगोलग महाराष्ट्राबाहेर काढावं तसेच भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीला माफी मागायला लावावी. पाठराखण करणाऱ्या फडणवीसांनी त्यांनी माफी मागायला भाग पाडावं, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. तसेच माझी भूमिका परखड असते. लपून छपून किंवा कुणाआडून मी बोलत नाही, असं सांगतानाच तो त्रिवेदी छत्रपतींविरोधात बोललाय म्हणजे बोललाय… चुकीच्या वक्तव्याची पाठराखण करु नका, असं म्हणत फडणवीसांनाही खडसावलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here