नवी दिल्ली/मुंबई: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचं एक पथक वसईत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब पुनावालानं तिची निर्घृण हत्या केली. आफताबची दिल्लीमध्ये नार्को टेस्ट केली जाण्याची शक्यता आहे. १८ मे रोजी आफताबनं श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर ३ आठवड्यांनी आफताब वसईतील घरी आला होता. त्यानं घरातलं बरंचसं सामान दिल्लीला शिफ्ट केलं. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी वसईत ३ जणांचा जबाब नोंदवला आहे. यातील एक व्यक्ती पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीशी संबंधित आहे.

आफताबनं वसई पूर्वेला असलेल्या त्याच्या फ्लॅटमधून दिल्लीच्या छतरपूरमधील फ्लॅटवर ३७ खोके पाठवले. आफताबनं अचानक मुंबईहून मेहरोलीच्या छतरपूरच्या पहाडी भागात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. श्रद्धाला संपवल्यानंतर जूनमध्ये आफताब वसईला आला होता. जवळपास ३ आठवड्यांनी दिल्लीहून वसईला आलेल्या आफताबनं मिरारोडस्थित गुडलक पॅकर्स आणि मूव्हर्सशी संपर्क साधला. आफताबनं कंपनीला २० हजार रुपयांचं ऑनलाईन पेमेंट केलं. आफताबनं एकूण ३७ खोके दिल्लीला पाठवले होते, अशी माहिती कंपनीचे कर्मचारी गोविंद यादन यांनी दिली. २०१९ पासून आफताब आणि श्रद्धा दिल्लीत राहू लागले. त्याआधी नायगाव, वसईतील ३ फ्लॅट्समध्ये ते भाड्यानं राहिले होते.
श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती; प्रेयसीच्या लग्नाबद्दल समजताच शारजावरून आला, वाद घातला अन्…
आफताबला पूर्वीपासून ओळखणाऱ्यांचे जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. वसई पूर्वेतील युनिक पार्क सोसायटीचे सचिव अब्दुल खान यांचाही जबाब घेण्यात आला. या ठिकाणी पुनावाला कुटुंब दोन दशकांपासून वास्तव्यास होतं. १२ नोव्हेंबरला म्हणजेच आफताबला अटक होण्याच्या २ आठवड्यांपूर्वीच आफताबचं कुटुंब अन्यत्र राहायला गेल्याची माहिती खान यांनी पोलिसांना दिली. युनिक पार्कमधलं घर पुनावाला कुटुंबानं भाड्यानं दिलं आहे.

आफताब श्रद्धावर अतिशय संतापला होता. त्यानं श्रद्धाचे फोटो जाळले. त्यानं तिच्या बँक खात्यातील पैसे स्वत:च्या खात्याच वळवले. श्रद्धानं माझ्याकडून पैसे घेतले होते. ते तिनं परत केले नव्हते, अशी माहिती आफताबनं पोलिसांना चौकशीत दिली. हत्येनंतर श्रद्धाचे तीन मोठे फोटो जाळले. यातले दोन फोटो उत्तराखंडच्या सहलीतील होते. तर तिसरा फोटो २०२० मध्ये गेट वे ऑफ इंडियाजवळ काढलेला होता. आफताबनं आधी फ्रेम तोडली. त्यानंतर फोटोंना आग लावली.
याला म्हणतात प्रेम! मृत प्रेयसीसोबत बांधली लगीनगाठ; कुटुंब, नातेवाईक सारेच गहिवरले
२६ मे रोजी आफताबनं श्रद्धाच्या बँक खात्यातून ५४ हजार रुपये काढले होते. श्रद्धानं माझ्याकडून पैसे उधार घेतले होते. तेच पैसे मी तिच्या खात्यातून माझ्या खात्यात वळते केल्याचं आफताबनं सांगितलं. १८ मे रोजी श्रद्धासोबत वाद झाला. त्यावेळी तिनं माझ्या दिशेनं एक वस्तू फेकली. त्यामुळे मला राग आला आणि त्याच रागात मी तिचा गळा दाबला, अशी माहिची आफताबनं पोलिसांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here