दोहा: कतार फिफा विश्वचषक आखाती देश कतारमध्ये मोठ्या जोमात सुरू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतारने फुटबॉल विश्वातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या आयोजनावर सुमारे २२२ अब्ज डॉलर्स इतका मोठा खर्च केला असल्याचे समोर आले आहे. ही रक्कम भारत आणि आशियातील दोन मोठे दिग्गज गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहे.

भारतीयांचा नादच खुळा! फुटबॉल पाहण्यासाठी १७ जणांनी मिळून खरेदी केले २३ लाखांचे घर
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अदानी यांची एकूण संपत्ती सध्या १३२ अब्ज डॉलर आहे तर अंबानीची एकूण संपत्ती ९० अब्ज डॉलर आहे. तर दोघांची एकूण संपत्ती २२२ अब्ज डॉलर्स इतकी आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून देशातील सर्वात मौल्यवान रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अंबानी या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत.

ना डोक्यावर छप्पर ना एकवेळचं जेवण, आता त्याच खेळाडूनं जिंकून दिला वर्ल्ड कपमधील सामना
सर्वात महागडी स्पर्धा
कतारमध्ये होणारा फुटबॉल विश्वचषक, आतापर्यंतची सर्वात महागडी क्रीडा स्पर्धा आहे. २० नोव्हेंबर रोजी यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली तर, अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे कतारने २०१० मध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते आणि तेव्हापासून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देशाने पाण्यासारखा पैसा ओतला आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी सहा नवीन स्टेडियम बांधण्यात आले असून दोन जुन्या स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यासोबतच खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी स्टेडियमही बांधण्यात आले आहेत, ज्यासाठी एकूण ६.५ अब्ज ते १० अब्ज डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीच्या बोलीमध्ये त्याची किंमत चार अब्ज डॉलर्स असल्याचे सांगण्यात आली होती.

FIFA World Cup : पहिल्याच सामन्यात यजमान कतारचा दारुण पराभव, इक्वेडोरची विजयी सलामी
द पर्लवर १५ बिलियन डॉलरचा खर्च
अमेरिकन स्पोर्ट्स फायनान्स कन्सल्टन्सी फ्रंट ऑफिस स्पोर्ट्सच्या मते, कतारने वर्ल्ड कपसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २१० अब्ज डॉलर खर्च केले आहेत. यामध्ये विमानतळ, रस्ते, नाविन्यपूर्ण हब, हॉटेल्स आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. एकट्या दोहामध्ये, द पर्ल, खेळाडूंना राहण्यासाठी एक संकुल बांधण्यासाठी १५ अब्ज डॉलर खर्च करण्यात आले, तर दोहा मेट्रोवर ३६ अब्ज डॉलरचा खर्च झाला. एवढेच नाही तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतारने अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दर आठवड्याला ५०० दशलक्ष डॉलर खर्च केले आहेत.

यापूर्वी २०१८ मध्ये रशियात फुटबॉल विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. त्यावर एकूण ११.६ अब्ज डॉलर खर्च करण्यात आले. त्यापूर्वी, २०१४ मध्ये ब्राझीलमध्ये १५ अब्ज डॉलर आणि २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत ३.६ अब्ज डॉलरचा खर्च करून स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याशिवाय २००६ मध्ये जर्मनीतील फुटबॉल विश्वचषकाचा खर्च ४.३ अब्ज डॉलर, जपानमधील २००२ च्या स्पर्धेचा खर्च ७ अब्ज डॉलर, फ्रान्स १९८ मध्ये २.३ अब्ज डॉलर आणि १९९४ मध्ये ५९९ दशलक्ष डॉलरचा खर्च झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here