: वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना धुळ्यातील एका आदिवासी पाड्यात घडली. अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याकरिता तिच्या कुटुंबीयांना पैशांचे प्रलोभन दाखवल्याचा आरोप एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ग्रामीण भागात लावून देण्याचे प्रकार वाढले आहेत. अलीकडेच अहमदनगर जिल्ह्यात चाइल्ड लाइनच्या मदतीनं अनेक बालविवाह रोखण्यात आले आहेत. आता धुळे जिल्ह्यातील ठाण्याच्या हद्दीतील एका आदिवासी पाड्यात अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवरदेव वरात घेऊन मुलीच्या घरी आला असता, त्याला एकलव्य आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. मुलीसोबत लग्न करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना पैशांचे प्रलोभन दाखवण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. लग्न जमवून देणाऱ्या मध्यस्थांनी मुलीच्या कुटुबीयांना लाखो रुपये दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी तिच्या कुटुंबीयांवर केला आहे. कार्यकर्त्यांनी सुरुवातीला नवरदेव आणि अन्य लोकांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर केली, असं व्हिडिओत दिसत आहे. वयानं तीनपटीनं मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न लावून दिलं जात होतं. पण मुलीला याची काहीच कल्पना नव्हती, असं सांगितलं जातं. या प्रकरणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुलीचे वडील आणि नवरदेवाविरोधात ही तक्रार दिली आहे.

व्हिडिओ पाहा:

नगरमध्ये २० हून अधिक बालविवाह रोखले

ग्रामीण भागात ऊस तोडणी कामगार, मजूर, गरीब शेतकरी यांच्यासाठी मुलींचे लग्न हे आव्हानच मानले जाते. समाजासोबत राहण्यासाठी रुढी-परंपरा, मानपान यांचे पालन करीत लग्न करायचे म्हणजे डोक्यावर कर्जाचा डोंगर असे चित्र अनेकदा पहायला मिळते. लॉकडाउनच्या काळात केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत आणि घरच्या घरी लग्न करण्यास सरकारने मुभा दिली. अर्थातच नाईलाजानं का होईना, याला समाजमान्यताही मिळाली. हीच संधी समजून अनेक गरीब वधूपित्यांनी कायद्याच्या अज्ञानातून तर कुठे नाइलाजातून आपल्या मुली उजविण्यास सुरुवात केल्याचे आढ‌ळून येत आहेत. कारण एकट्या नगर जिल्ह्यात लॉकडाउन काळात जवळपास वीस बालविवाह चाइल्ड लाइनने रोखले आहेत. चाइल्ड लाइनच्या पथकाने शेवगाव, पारनेर, अकोले, पाथर्डी व नगर या पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक असे एकूण पाच बालविवाह रोखले आहेत.


Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here