भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका खासगी रुग्णालयात नर्सनं शनिवारी रात्री उशिरा आत्महत्या केली. आत्महत्येसाठी नर्सनं वापरलेली पद्धत पाहून पोलिसांना धक्का बसला. नर्सनं ऍनेस्थेशियाचा ओव्हरडोज घेऊन जीवनयात्रा संपवली.

विशाखा कहार असं नर्सचं नाव असून तिचं वय २५ वर्षे होतं. विशाखा मूळची नर्मदापुरमची रहिवासी होती. भोपाळमधील खासगी रुग्णालयात ती कार्यरत होती. शनिवारी रात्री हॉस्टेल रुमवर पोहोचल्यानंतर विशाखा अचानक बेशुद्ध पडली. त्यावेळी तिचे रुममेट तिथेच होती. विशाखाच्या हाताजवळ तिला एक इंजेक्शन सापडलं. तिच्या हातावर इंजेक्शनची खूणही होती.
संपूर्ण कुटुंब संपलं; पती, पत्नी अन् ४ मुलांचा संशयास्पद शेवट; ‘त्या’ घरात नेमकं काय घडलं?
हॉस्टेलमधून विशाखाला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. ऍनेस्थेशियाचा ओव्हरडोस घेऊन विशाखानं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर दिली. विशाखाजवळ पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलीस सध्या विशाखाच्या मित्र परिवार, रुममेट आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवत आहेत. विशाखाच्या आयुष्यात नेमकं काय सुरू होतं, तिनं टोकाचा निर्णय का घेतला याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती; प्रेयसीच्या लग्नाबद्दल समजताच शारजावरून आला, वाद घातला अन्…
विशाखानं तिच्या डाव्या हातावर इंजेक्शन घेतलं होतं. इंजेक्शन टोचल्याच्या खुणा पोलिसांना हातावर आढळून आल्या आहेत. पोलिसांना हॉस्टेल रुममध्ये ऍनेस्थेशियाची बाटली आढळून आली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली. विशाखाचा मोबाईलदेखील पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याचं लॉक उघडण्याचं काम सुरू आहे. रविवारी मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर मृतदेह विशाखाच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here