कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये महिला डॉक्टरनं एका रुग्णाविरोधात पोलीस तक्रार नोंदवली आहे. रुग्ण त्रास देतो, वेगवेगळ्या नावानं पावती बनवून डॉक्टरला पाहायला येतो, उपचारांच्या बहाण्यानं पाहत बसतो, अशी तक्रार महिला डॉक्टरनं पोलीस ठाण्यात केली. महिला डॉक्टर रुग्णालयात नसल्यास तो इतरांकडे विचारणा करायचा. याची माहिती मिळाल्यानंतर महिलेनं याबद्दलची तक्रार वरिष्ठांकडे केली. यानंतर डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाला धडा शिकवण्याचं ठरवलं.

कानपूरच्या जीएसव्हीएम वैद्यकीय रुग्णालयात हा प्रकार घडला. आरोपी रुग्णाचं नाव तौहीद आहे. शनिवारी, १९ नोव्हेंबरला तौहीद ओपीडीची चिठ्ठी घेऊन डॉक्टरांच्या रुममध्ये पोहोचला. त्यानं महिला डॉक्टराबद्दल विचारताच कर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं. त्याची धुलाई केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
हॉस्टेलमध्ये पोहोचल्यानंतर नर्स जागीच कोसळली; आयुष्य संपवण्यासाठी भयानक पद्धत वापरली
जीएसव्हीएम महाविद्यालयात एक वैद्यकीय विद्यार्थिनी इंटर्नशिप करत आहे. एक तरुण रुग्ण बनून येतो आणि तिला त्रास देतो. विविध नावांनी ओपीडीची पावती तयार करून तिला पाहत बसतो, अशा स्वरुपाची तक्रार आम्हाला मिळाली होती. याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं कानपूरच्या अपर पोलीस उपायुक्त अमिता सिंह यांनी सांगितलं.
संपूर्ण कुटुंब संपलं; पती, पत्नी अन् ४ मुलांचा संशयास्पद शेवट; ‘त्या’ घरात नेमकं काय घडलं?
कानपूरच्या जाजमऊ येथे वास्तव्यास असलेला तौहिद १५ दिवसांपूर्वी आजारी पडला. उपचारांसाठी तो वैद्यकीय महाविद्यालयाच्या ओपीडीत पोहोचला. तिथे एक तरुणी इंटर्नशीप करत होती. तिनं तौहीदवर उपचार केले. तेव्हापासून तौहीद दररोज वैद्यकीय महाविद्यालयात येऊ लागला. ५-६ वेळा त्यानं विविध नावांनी पावती तयार केली. ही बाब डॉक्टरच्या लक्षात आली. त्यानंतर तिनं वरिष्ठांकडे तक्रार केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here