Maharashtra Political crisis | काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्याच्या पूर्वसंध्येला नांदेड जिल्ह्यातील युवासेनेच्या तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर हे सर्व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा होती. मात्र, युवासेना प्रदेश सहसचिव माधव पावडे यांनी यशस्वी मध्यस्थी करत या ३५ पदाधिकाऱ्यांची भेट वरुण सरदेसाई यांच्याशी घडवून आणली होती. तेव्हादेखील वरुण सरदेसाई यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढली होती.

हायलाइट्स:
- ठाकरेंच्या गोटात मोठे चिंतेचे वातावरण
- युवासेनेत प्रचंड नाराजी
- एकाचवेळी ३५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
राजीनामा दिलेल्या युवासेनेच्या ३५ महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील शिवसेना भवनात युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांची भेट घेतली. या सगळ्याजणी आपला राजीनामा सुपूर्द करण्यासाठी शिवसेना भवनात आल्या होत्या. मात्र, वरुण सरदेसाई यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला. तुम्ही सांगितलेल्या अडचणींवर उपाय काढला जाईल. तुम्ही आपलं काम सुरु ठेवा, असे सांगून वरुण सरदेसाई यांनी या महिला पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
महिला पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे कारण काय?
पुण्यातील युवासेनेत असलेली अंतर्गत गटबाजी व कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे कारण पुढे करत ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाच्या कोणत्या नेत्यांवर या महिला पदाधिकारी नाराज आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आता वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे पुण्यातील पक्षसंघटनेत काही बदल करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वरुण सरदेसाई पुन्हा संकटमोचक ठरले
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्याच्या पूर्वसंध्येला नांदेड जिल्ह्यातील युवासेनेच्या तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर हे सर्व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा होती. मात्र, युवासेना प्रदेश सहसचिव माधव पावडे यांनी यशस्वी मध्यस्थी करत या ३५ पदाधिकाऱ्यांची भेट वरुण सरदेसाई यांच्याशी घडवून आणली होती. तेव्हादेखील वरुण सरदेसाई यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढली होती. तुम्ही कामाला लागा. निश्चितपणे युवासेना आगामी काळात महत्त्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास दिल्यानंतर युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य संपले होते. त्यामुळे आता वरुण सरदेसाई पुन्हा एकदा युवासेनेसाठी संकटमोचक ठरताना दिसले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.