बिलासपूर : शेअर मार्केटमुळे बिलासपूर शहरामध्ये एका तरुणीला जीव गमवावा लागला. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानंतर स्वत:चे ११ लाख रूपये परत घेण्यासाठी गेलेल्या या तरुणीच्या मित्रानेच गळा दाबून हत्या केली. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून ४ दिवस मृतदेह कारमध्ये लपवला. दररोज सकाळ, सायंकाळ तो मृतदेहावर परफ्यूम मारायचा, कारमध्ये सेंटेड उदबत्तीही लावत होता. मृतदेह सडून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात बिलासपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील प्रियांका सिंह या तरुणीची मित्राकडून हत्या झाल्याचं समोर आलं आहे. प्रियांका दुर्ग-भिलाई येथील रहिवासी होती. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ती बिलासपूर येथील टिकरापारा येथील हॉस्टेलमध्ये राहत होती. अभ्यासासह ती शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करत होती. यातूनच तिची ओळख मेडिकल दुकानाचा मालक व शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या आशिषसोबत झाली. त्यानंतर तिनं आरडाओरडा सुरु केला. आशिषने तिला दुकानात बोलावलं आणि शटर बंद करून तिचा गळा दाबत हत्या केली.

क्रिकेटमध्ये इतिहास घडला; आजपर्यंत असं कधीच झालं नाही, ४३५ धावांनी मिळवला विजय
दुकानात प्रियांका आणि आरोपी आशिष यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. आशिषनं गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे त्याला समजत नव्हते. सुरुवातीला त्याने मृतदेह पॉलिथीनमध्ये पॅक केला व नंतर तो कारमध्ये ठेवला. मृतदेह फेकण्याची त्याची हिम्मत झाली नाही. मृतदेहाला त्याने घरी आणले व गॅरेजमध्ये लपवून ठेवलं. मात्र, चार दिवसानंतर मृतदेहाची सर्वत्र दुर्गंधी पसरत होती.

प्रियांका मागील चार दिवसांपासून बेपत्ता होती. तिचे कुटुंबीय शोध घेत होते. पण तिची माहिती मिळालीच नाही. त्यानंतर प्रियांकाचे वडील बृजेश सिंह मुलगा हिमांशूला सोबत घेऊन बिलासपूर येथील शहर कोतवालीत गेले आणि त्यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरु केला. नंतर आशिषनेच प्रियकांची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं. मृतदेह लपवण्यासाठी आरोपीने केलेलं कृत्य पाहून पोलिसही चक्रावून गेले होते. या प्रकरणाची कसून चौकशी पोलीस करत आहेत.

अंबाबाई मंदिर संस्थानाला सापडला दुर्मिळ खजिना; शके १७८६ मधील हस्तलिखित ऐतिहासिक ग्रंथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here