सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे मोठ्या प्रमाणात मासे आढळले आहेत. हवामानातील बदल आणि यांत्रिक मासेमारी याच्या आक्रमणामुळे पारंपरिक मासेमारी विस्कळीत झाली आहे. विस्कळीत झालेल्या पारंपारिक मासेमारीच्या सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात मासळी मिळणं ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने या मिळालेल्या बंपर मासळीमुळे मच्छिमार आनंदित झाले आहेत.

मालवणमधील वयरी समुद्रकिनारी मच्छिमार समुदायाने त्यांच्या पारंपरिक जाळ्यात तारली आणि बांगडा हे मासे पकडले आहेत. मोठ्या कालावधीनंतर मिळालेली मासळी पाहून मच्छिमार आनंदाने आश्चर्यचकित झाले आहेत.

‘आम्ही आज किमान १३ ते १५ टन मासे पकडण्यात यशस्वी झालो आहोत. पण ही दुर्मिळ घटनांपैकी एक घटना आहे. जवळपास तीन वर्षांच्या कालावधीनंतर ही बंपर मासळी मिळाल्यानेआम्ही सर्वच आनंदी आहेत,’ असं सिंधुदुर्ग जिल्हा रापण संघटनेचे सचिव दिलीप घारे यांनी सांगितलं.

हेही वाचा – सिंधुदुर्गमधील देवगडमध्ये विदेशी टॅगिंग असलेला पक्षी आढळला , कोकणात खळबळ, उच्चस्तरीय खलबतं सुरू

घारे म्हणाले की, महाराष्ट्रातील एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०८ रापण असोसिएशन असून या माध्यमातून २७,००० कुटुंबं आपलं पोट भरत आहेत. ते म्हणाले, मालवणमध्येच ५६ रापण संघ आहेत, ज्यात १० हजार ते १२ हजार लोक समाविष्ट आहेत. हे लोक पारंपारिक मासेमारीच्या व्यवसायात सक्रियपणे सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलं. सिंधुदुर्गच्या किनारी पट्ट्यात पारंपारिक मासेमारी व्यवसाय हळूहळू कमी होत असताना, बेरोजगार असलेल्या अनेकांसाठी हाच व्यवसाय आशेचा किरण बनला असल्याचंही ते म्हणाले.

Sindhudurg Malvan Fishing News

येथील गृहस्थ नारायण जगन्नाथ मयेकर हे ७० वर्षाचे आहेत. त्यांनी वरळी, मुंबई येथील बसंत कुमार बिर्ला समूहाच्या १०९ वर्षीय जुन्या सेंचुरी मिलमध्ये काम केले. ही मिल जवळपास दशकभरापूर्वी बंद पडल्यापासून ते बेरोजगार आहेत. यानंतर मयेकर त्यांच्या मालवण गावी परतले. ते बेरोजगार होते, पण त्यांना पारंपरिक मासेमारीच्या रूपात आता रोजगार मिळाला. ते त्यांच्या वायरी गावातील रापण संघात सामील झाले आहेत. याच माध्यमातून, या ठिकाणाहून ते आपला रोजगार मिळवत आहेत.

Sindhudurg

या ठिकाणी भेटलेला मच्छिमार रूपेश तळवणेकर हा देखील पदवीधर तरुण आहे. पण त्याला त्याच्या उत्पन्नाचा स्रोत पारंपारिक मासेमारीतून सापडला. रूपेशने सांगितलं, की पारंपारिक मासेमारीत गुंतलेले २० टक्के मनुष्यबळ हे शिक्षित असलं, तरी ते बेरोजगार असल्याने हा व्यवसाय निवडत आहेत. तुम्ही या उपक्रमात सहभागी असाल, तर दरमहा जवळपास १५ ते २० हजार रुपये कमवू शकता, असंही तो म्हणाला.

हेही वाचा – सिंधुदुर्गात दुर्मिळ घटना; एकाचवेळी तब्बल १५ टन मासे सापडले; किनाऱ्यावर बांगडे, तारलींचा खच

दरम्यान मालवण येथील मासळी स्थानिक बाजारपेठेत विकली जाते. येथील बहुतांश मासे हुबळी, बेंगळुरू आणि गोवा यांसारख्या ठिकाणी पाठवली जाते. येथील घाऊक विक्रेते त्याचा साठा करतात आणि नंतर देशाबाहेर याची निर्यात करतात, अशी माहितीही यावेळी मच्छिमार बांधवानी दिली.

Sindhudurg Malvan

गेल्या तीन वर्षाच्या काळात मच्छिमार बांधवाना अनेक संकटाना तोंड द्यावं लागलं आहे. करोना काळात फारच वाईट अवस्था आली होती. आता कुठे दिवस पालटू लागले आहेत. यावर्षीच्या पहिल्याच हंगामात मिळालेल्या चांगल्या मासळीने मच्छिमारीचा श्री गणेशा जोरात झाला आहे. मात्र सार काही निसर्गाच्या हातात आहे हेदेखील सांगायला हे मच्छिमार बांधव विसरले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here