या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. सी काँच रिसॉर्ट हे पुष्कर मूळ्ये नामक व्यक्तीचे असून या रिसॉर्टजवळही अनिल परब यांचा संबंध असल्याच म्हटले जात आहे. दरम्यान सोमय्या यांचे हे सगळे आरोप अनिल परब यांनी फेटाळून लावले आहेत.
साई रिसॉर्ट शेजारी असलेल्या सी काँच रिसॉर्टच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्कर मुळ्ये यास फरार घोषित करावे अशी मागणी आपण पोलिसांकडे केली आहे अशी माहिती यापूर्वी सोमय्या यांनी दिली होती. तसाच गुन्हा अनिल परब यांच्यावरही दाखल करण्यात येईल. या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंवासाच्या शिक्षेची तरतूद आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. हे रिसॉर्ट बांधकामसाठी पैसे कुठून आले, याची चौकशी आयकर व ईडीद्वारे करण्यात येत आहे. हे रिसॉर्ट पडले की त्याचीही चौकशी होईल असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांचे उजवे हात असलेले अनिल परब कोव्हिड कलावधीत काळी कामे करत होते. रिसॉर्टचे इलेक्ट्रिक बिल अनिल परब यांच्या नावाने येते. जागेचे मूळ मालक विभास साठे यांनी लिहून दिले आहे की मी जमीन विकली आहे. पुढील एनए करून अनिल परब यांनी फसवणूक केली आहे, असे सोमय्या यांनी म्हटले होते. रिसॉर्ट सीआरझेडमध्ये बांधण्याचा हा गुन्हा आहे. यामुळे हे भ्रष्टाचाराचे स्मारक तुटणार. हे दसऱ्याला तुटेल असा दावा सोमय्या यांनी केला होता. मात्र तो दावा फेल गेला आहे.
१४ नोव्हेंबर रोजी ही दोन्ही रिसॉर्ट पाडण्यासाठी एजन्सीकडून मागवण्यात आलेल्या निविदा उघडण्यात आल्या. यावेळी हे काम मुंबईतील एका एजन्सीला देण्यात आले आहे. दरम्यान सी कॉच रिसॉर्टवरील प्रत्यक्ष कारवाई सुरू होईल. त्यावेळी सोमय्या तेथे हजर राहण्याची शक्यता असून ते साई रिसॉर्टवरही अशीच कारवाई करावी अशी मागणी करण्याची शक्यता आहे. या कारवाईसाठी महसूल प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून तयारी सुरू असून कायदा सुव्यवस्था या आवश्यक बाबी पूर्ण झाल्यावर दिवसभरात कोणत्याही क्षणी साई रिसॉर्टशेजारी असलेल्या सी कॉच रिसॉर्टवर हातोडा पडू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.