मुंबई : मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजार किंचित वाढीसह उघडले. बीएसईच्या ३० समभागांवर आधारित सेन्सेक्स सकाळी ९:९१ वाजता २२.४ अंकांच्या किंवा ०.४ टक्क्यांच्या वाढीसह ६१,१६७.२४ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. पण एनएसई निफ्टी ३.०५ अंकांनी किंवा ०.०२ टक्क्यांनी घसरून १८,१५६.९० अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टीच्या सुरुवातीच्या व्यापारात टीसीएस (TCS) समभाग ०.६७ टक्क्यांनी घसरत होते. त्याचप्रमाणे पॉवरग्रीड, जेएसडब्ल्यू स्टील, अपोलो हॉस्पिटल्स आणि नेस्ले इंडियाचे समभाग लाल रंगात व्यवहार करत होते.

या समभागांमध्ये तेजी
डॉ रेड्डीज, लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट आणि मारुती एनएसईच्या निफ्टीवर ०.६७ टक्क्यांनी वाढून व्यवहार करत होते.

बक्कळ पैसा कमाईसाठी गुंतवणूकदरांची बाजारात ‘एन्ट्री’; ‘डीमॅट’ खात्यांची संख्या १०.४ कोटींवर
सोमवारची स्थिती
देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. जागतिक बाजारातील कमजोर ट्रेंडमध्ये बीएसई सेन्सेक्स ५१८ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर ३० शेअर्सचा सेन्सेक्स ५१८.६४ अंकांनी म्हणजेच ०.८४ टक्क्यांनी घसरून ६१,१४४.८४ वर बंद झाला. व्यवहारादरम्यान एका क्षणी सेन्सेक्स ६०४.१५ अंकांनी खाली घसरला होता. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १४७.७० अंकांनी म्हणजेच ०.८१ टक्क्यांनी घसरून १८,१५९.९५ अंकांवर बंद झाला.

विदेशी गुंतवणूकदारांची कमाईची चाल; १० शेअर्सवर लाखो कोटी गुंतवले, तुमच्याकडे आहेत का?
रुपया तेजीने उघडला
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने उच्चांक गाठला. आज रुपया १२ पैशांच्या वाढीसह ८१.७२ च्या पातळीवर उघडला. तर सोमवारी कच्च्या तेलाची किंमत ८२ डॉलरवर घसरली होती तर, यावेळी ते ८८ डॉलरच्या जवळ आहे. दुसरीकडे, अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाला. डाऊ जोन्स ०.१३ टक्के, S&P 500 ०.३९ टक्के आणि नॅसडॅक १.०९ टक्क्यांनी घसरले.

दमदार कमाईची संधी; बँकिंग शेअरमध्ये मोठी तेजी, लक्षणीय परताव्याची शक्यता
NDTV साठी अदानी समूहाची ४९३ कोटी रुपयांची ओपन ऑफर आजपासून
दरम्यान, अदानी समूहाची मीडिया कंपनी नवी दिल्ली टेलिव्हिजन (NDTV) मधील अतिरिक्त २६ टक्के हिस्सेदारी बाजारातून विकत घेण्याची ओपन ऑफर आजपासून सुरू होणार आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या वतीने ऑफरचे व्यवस्थापन करणाऱ्या जेएम फायनान्शिअलने एका नोटीसमध्ये म्हटले की, ओपन ऑफर २२ नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि ५ डिसेंबर रोजी बंद होईल. कंपनीने त्याच्या खुल्या ऑफरसाठी किंमत बँड २९४ रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने ७ नोव्हेंबर रोजी NDTV मधील अतिरिक्त स्टेक घेण्यासाठी अदानी समूहाच्या ४९२.८१ कोटी रुपयांच्या प्रस्तावित ऑफरला मान्यता दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here