Nashik News : मुंबईत गोवराचा विळखा आता बसत चालला आहे. विशेष करून झोपडपट्टी भागात या संसर्गाचा उद्रेक झाला आहे. भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला, भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर या भागांत गोवराचे अधिक रुग्ण आहेत. गोवंडीत एक वर्षाच्या मुलीचा सोमवारी मृत्यू झाला. याची गोवर संशयित मृत्यू म्हणून नोंद केली गेली. गोवरचा संसर्ग हा मुंबईतून नाशिक जिल्ह्यात आला आहे. मालेगावसह आता नाशिक शहरातही रुग्ण संशयित रुग्ण आढळले आहेत.

गोवर हा संसर्गजन्य आजार आहे. तो लहान बालकांना अधिक होत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. मुंबईमध्ये गोवरचा उद्रेक झाल्यानंतर त्या पाठोपाठ मालेगावमध्ये रुग्ण आढळले आणि आता नाशिक शहरात संशयित आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात तपासणीत संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बालकांसाठी संसर्गजन्य कक्ष तयार करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
काळजी घ्या! गोवराचे दहा मृत्यू, एक मृत्यू संशयित; मुंबईत बाधितांची संख्या २०८ वर
जिल्ह्यात मालेगावमध्ये आढळले ४४ रुग्ण
मालेगाव पालिकेसह जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली होती. या गोवर रुग्णांवर मालेगावातील पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पाठोपाठ आता गोवरच्या रुग्णांमध्ये नाशिकचा नंबर लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. गोवरची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेला माहिती कळवावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या चार संशयितांच्या अहवालाकडे देखील आता आरोग्य यंत्रणांची लक्ष लागून आहे.
नाशिक शहरातही गोवर? चार संशयित रुग्ण, तपासणीसाठी नमुने मुंबईतील हाफकिन लॅबमध्ये
गोवरमुळे मुंबई आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू
मुंबईत गोवराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मृत्यू झालेल्या लहान मुलांची संख्या आता दहावर गेली आहे. त्यापैकी एक मृत्यू हा मुंबईबाहेरील रुग्णाचा असल्याची माहिती आहे. तर अद्याप एका मृत्यूची निश्चित नोंद झालेली नाही. मृत्यू विश्लेषण समितीने झालेल्या मृत्यूंमागील कारणांचे वैद्यकीय विश्लेषण केले आहे. यात ९ मृत्यू हे गोवरामुळे झाल्याचे मुंबई पालिका प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबईत २०८ रुग्णांना गोवराची लागण झाली आहे. तर ३,२०८ रुग्ण संशयित आहेत.