मुंबई: श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीचा शेवटचा रविवार असल्यानं राज्यातील मासांहारप्रेमींनी आजच ‘गटारी’ सेलिब्रेशन सुरू केलं आहे. आज सकाळपासूनच चिकण व मटणाच्या दुकानांसमोर लांबलचक रांगा लागल्या आहेत. गटारीच्या आनंदात अनेक ठिकाणी नागरिकांनी ‘सोशल डिस्टन्स’लाही अंतर दिलं असून लॉकडाऊनचा शीण घालवण्यासाठी गटारीचा पुरेपूर उपयोग केला जात असल्याचं चित्र आहे.

वाचा:

येत्या मंगळवारपासून श्रावण सुरू होणार आहे. श्रावण महिना हा अनेकांचा शाकाहारी महिना असतो. हा संपूर्ण महिना मांसमटण वर्ज्य करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात ही परंपरा मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. अनेक लोक श्रावण महिना संपल्यानंतरही गणपती विसर्जन होईपर्यंत मांसमच्छी खाणे टाळतात. त्यामुळं हा महिना सुरू होण्याआधी येणारी गटारी अमावस्या मटण, मासे व चिकण खाऊन साजरी करण्याची प्रथा आहे.

खरंतर, यंदाची आषाढी (गटारी) अमावस्या सोमवारी म्हणजेच उद्या आहे. मात्र, आजपासूनच सेलिब्रेशन सुरू केलं आहे. सोमवारी अनेकांचे उपवास असतात. त्यामुळं ही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळं लोक घरी असल्यानं गटारीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आधीच ठरलेल्या नियोजनानुसार लोक घराबाहेर पडले आहेत. मासळी बाजार, चिकण व मटणाच्या दुकानांमध्ये चांगलीच गर्दी दिसतेय. लोकांच्या तोंडावर मास्क दिसत असले तरी सोशल डिस्टन्स आवश्यक तितकं पाळलं जात नसल्याचं चित्र आहे.

वाचा:

हॉटेल व बार एरवीसारखे सुरू नसल्यानं सेलिब्रेशनला मर्यादा असल्या तरी लोकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. वाइन शॉपच्या दुकानांसमोरही चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. पुण्यातही लॉकडाऊन काहीसा शिथिल झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद सर्वच ठिकाणी लोक गटारी दणक्यात साजरी करत आहेत. मात्र, १०० टक्के लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here