नवी दिल्ली: सोन्याच्या दरात (Gold Price Today) मंगळवारी तेजी पाहायला मिळत आहे. डॉलरची वाढ मंदावल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या ताज्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून या बैठकीतून येत्या काळात दरवाढीबाबतचे संकेत मिळतील. चलनवाढ रोखण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक सातत्याने व्याजदर वाढवत आहे. यूएस फेडच्या बैठकीचे निर्णय २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जातील आणि चलनविषयक धोरणावरील केंद्रीय बँकेचा दृष्टिकोन स्पष्ट होईल.

यादरम्यान, मंगळवारी देशांतर्गत वायदे बाजारातही सोन्याचे भाव वधारले. एमसीएक्स एक्सचेंजवर सुरुवातीच्या व्यापारात, ५ डिसेंबर २०२२ रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ०.२७ टक्के किंवा १४३ रुपयांनी वाढून ५२,४३५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मंगळवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदे आणि स्पॉट किमतीतही वाढ झाली.

अचानक पैशाची गरज भासल्यास काय करावे, जाणून घ्या तुमच्याकडे कोणते पर्याय
चांदीमध्येही तेजी
याशिवाय सोन्यासोबतच चांदीच्या देशांतर्गत वायदा किमती (Silver Price Today) देखील वाढीसह व्यवहार करताना दिसून आली. MCX वर, ५ डिसेंबर २०२२ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा दर मंगळवारी सकाळी ०.९७ टक्क्यांनी किंवा ५८७ रुपयांनी वाढून ६१,२२२ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. जागतिक स्तरावरही चांदीच्या देशांतर्गत आणि वायदा किमतीत वाढ झाली आहे.

तुम्ही परदेशातून किती सोने भारतात आणू शकता, काय सांगतो कायदा; जाणून घ्या सर्वकाही
सोन्याची जागतिक किंमत
जागतिक स्तरावर बोलायचे झाले तर, मंगळवारी सकाळी सोन्याच्या फ्युचर्स आणि स्पॉट किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत ०.३२ टक्क्यांनी किंवा ५.६० डॉलरने वाढून १७६०.२० डॉलर प्रति औंस वर व्यापार होताना दिसत आहे. त्याच वेळी, सोन्याची जागतिक स्पॉट किंमत ०.३७ टक्के किंवा ६.३५ डॉलरच्या वाढीसह सध्या १७४४.४० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

शेअर्सप्रमाणे सोने खरेदी-विक्री; दिवाळीनिमित्त बाजारात EGR लाँच, पाहा नेमके आहे तरी काय?
जागतिक चांदीची किंमत
तसेच चांदीच्या जागतिक किमतींबद्दल (Global Silver Price) बोलायचे झाल्यास, मंगळवारी सकाळी फ्युचर्स आणि स्पॉट किमती दोन्ही घसरल्या आहेत. ब्लूमबर्गच्या मते, मंगळवारी सकाळी चांदीची जागतिक फ्युचर्स किंमत कॉमेक्सवर २१.३५ डॉलर प्रति औंस १.३७ टक्क्यांनी किंवा ०.२९ डॉलरवर व्यापार करताना दिसून आली. त्याच वेळी, चांदीची जागतिक स्पॉट किंमत १.३० टक्के किंवा ०.२७ डॉलरच्या वाढीसह सध्या २१.१२ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत
मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १४ पैशांनी वाढून ८१.६५ वर पोहोचला. अशा प्रकारे, स्थानिक चलनाने मागील बंद किंमतीच्या तुलनेत १४ पैशांची वाढ नोंदवली. सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया पाच पैशांनी घसरून ८१.७९ वर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here