मुंबई: टाटा समूहाचा शेअर गुंतवणूकदारांना सर्वाधिक कमाई करून देण्यासाठी फायद्याचा ठरला आहे. पण आता टाटांच्या टेलिसर्व्हिसेस कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान केले आहे. टाटा समूहाचा हा एक शेअर त्याच्या गुंतवणूकदारांचे सतत नुकसान करत आहे. एकेकाळी तेजीत असलेला स्टॉक सध्या त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ६६% खाली घसरला आहे.

बक्कळ पैसा कमाईसाठी गुंतवणूकदरांची बाजारात ‘एन्ट्री’; ‘डीमॅट’ खात्यांची संख्या १०.४ कोटींवर
टाटा समूहाच्या या शेअरने ११ जानेवारी २०२२ रोजी २९१.०५ रुपयांच्या ५२ आठवड्यांची सर्वोत्तम कामगिरी केली होती. या शेअरचे नाव टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड म्हणजेच (टीटीएमएल) आहे. सध्या टीटीएमएल शेअर १०० रुपयांच्या खाली ९९.२५ रुपयांवर घसरला आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडने S&P बीएसई दूरसंचार निर्देशांकात ४.२१% वाढ आणि सेन्सेक्समध्ये ३.०७% वाढीच्या तुलनेत गेल्या एका महिन्यात २.८४% घसरण नोंदवली आहे.

BSE निर्देशांकात मोठा बदल; डॉ रेड्डीजचा स्टॉक सेन्सेक्समधून ‘आऊट’, टाटांच्या ऑटो कंपनीची एंट्री
या वर्षी YTD मध्ये शेअर्स ५४% घसरला
या वर्षी YTD मध्ये टाटा टेलिसर्व्हिसेचे शेअर्स ५४% पर्यंत तुटले आहेत. यादरम्यान शेअर २१६ रुपयांवरून ९९.२५ रुपयांवर घसरला आहे. म्हणजे एक लाखाची गुंतवणूक कमी होऊन फक्त ४५ हजार राहिली आहे. त्याच वेळी, २९१.०५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर १ लाख रुपयांची गुंतवणूक सुमारे ३३ हजार रुपयांवर आली. याशिवाय गेल्या पाच दिवसांत हा साठा जवळपास ५% घसरला आहे. त्याच वेळी, हा स्टॉक एका वर्षात सुमारे १८% वाढला आहे. टाटा टेलिसर्विसेस, ही टाटा समूहाची लार्ज कॅप कंपनी आहे.

गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान! यंदा लिस्टींग झालेल्या IPOनी लाखो कोटी बुडवले
कंपनीचा व्यवसाय काय
TTML ही टाटा टेलिसर्व्हिसेसची उपकंपनी असून ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. बाजारातील तज्ज्ञांनुसार गेल्या महिन्यात कंपनीने कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुरू केली आहे. तसेच कंपन्यांना क्लाउड आधारित सुरक्षा सेवा आणि वेगवान इंटरनेटसह ऑप्टिमाइझ्ड नियंत्रण मिळत असल्याने याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

(नोट: येथे केवळ स्टॉकच्या कामगिरीबद्दल माहिती दिली गेली आहे, हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here