नवी मुंबई : नवी मुंबई भूखंडाचे दर गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडल्याचा पाहायला मिळतं. सिडकोच्या ऐरोली, घणसोली, वाशी, नेरूळ, बेलापूर, खारघर या मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांच्या किमती वाढल्या आहेत. अशात सिडकोचे भूखंड घेण्यासाठीदेखील स्पर्धा पाहायला मिळते. सानपाडामधील भूखंडासाठी आजवरचा सर्वात जास्त दर मिळाला आहे. नवी मुंबईतील इमारतींवरील उंचीचे निर्बंध हटवल्याने जमिनीच्या किमतीची क्षमता उघड झाली आहे. सानपाडा नोड येथील ५,५२६ चौरस मीटर निवासी-कम-व्यावसायिक भूखंडाला सोमवारी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) ई-लिलावात रु. ५.५४ लाख प्रति चौरस मीटरची विक्रमी बोली लावली आहे.

शहरातील बोलीची किंमत सर्वाधिक असल्याचे सिडकोच्या (CIDCO)अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. हा प्लॉट पाम बीच रोड जवळ आहे. विजयी बोली ही रु.१,१४,०८९ प्रति चौरस मीटर या मूळ किमतीच्या जवळपास पाचपट होती. जुलै २०२२ मध्ये, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या २० किमीच्या परिघात असलेल्या इमारतींसाठी उंची NOCs (ना-हरकत प्रमाणपत्रे) देण्याचे मान्य केले.

१ घर, ४ फास आणि ६ जणांचे शव; अंगाचा थरकाप उडवणारी घटना; पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा
अशा प्रकारे, समुद्रसपाटीपासून सरासरी १६०.१० मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना आता शहरात परवानगी आहे. विकासकांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे आता ४८ मजल्यापर्यंत इमारती बांधता येतील.

सानपाडा प्लॉटसाठी एकूण सहा बोलीदारांनी DPVG व्हेंचर्स LLP सोबत प्रति चौरस मीटर रुपये ५,५४,०८९ ची विजयी बोली लावली. प्लॉट १.५ च्या फ्लोअर स्पेस इंडेक्ससह विकसित केला जाऊ शकतो. युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन (यूडीसीपीआर) अंतर्गत, विकासक ५ पर्यंत एफएसआय अनुलंब वापरू शकतो.

“उंचीचे निर्बंध हटवणे आणि UDCPR ची अंमलबजावणी या दोन्ही निर्णयांमुळे नवी मुंबईतील भूखंडांची क्षमता उघड झाली आहे,” असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई (BANM) चे तत्कालिन माजी अध्यक्ष हरेश छेडा म्हणाले.

India Team : सेहवागसारखी खेळी, सचिनसारखा फॉर्म तरी १७ महिने संघाबाहेर हा खेळाडू, करिअर संपणार?
विशेष म्हणजे, २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या ई-लिलावात आणखी एका प्लॉटला दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च किंमत मिळाली. नेरुळमधील सेक्टर ४० मधील १,३०४.९५ चौरस मीटरच्या निवासी-कम-व्यावसायिक भूखंडाला ४,८०,३३९ रुपये प्रति चौरस मीटरची बोली लागली. याची मूळ किंमत १,१७,३३९ रुपये होती.

ऑगस्टमध्ये, नेरुळमधील सेक्टर १९A येथील ३,०६९ चौरस मीटरच्या निवासी-कम-व्यावसायिक भूखंडाला ३.८५ लाख रुपये प्रति चौरस मीटरची तत्कालीन सर्वोच्च बोली लागली होती. सिडकोने नवी मुंबईतील सात नोडमध्ये २८ भूखंड विकून १,३६५.६ कोटी रुपये कमावले आहेत.

पृथ्वीचं मोठं रहस्य उलगडणार, ४६० दशलक्ष वर्ष जुन्या अंतराळातील खडकात काय दिसलं पाहा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here