fight in mumbai local: व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुण वाद घालताना दिसत आहेत. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना ढकललं. पुढे याचं रुपांतर हाणामारीत झालं. विरार लोकलमध्ये हा वाद झाला.

विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये दोन तरुणांचा वाद झाला. लोकल दोन रेल्वे स्थानकांच्या मध्ये असताना वादाला सुरुवात झाली. पुढील स्थानक येईपर्यंत वाद वाढत गेला. तू बाहेर चल, तुला दाखवतो, अशा शब्दांत एकानं दुसऱ्याला थेट आव्हान दिलं. त्यानं दुसऱ्याला फलाटाच्या दिशेनं खेचलं. फलाटावर जाण्याआधी दोघांची लोकलमध्ये मारामारी झाली. त्यानंतर एकानं दुसऱ्याला खेचून उतरवलं. फलाटावरही दोघे एकमेकांना भिडले आणि वाद सुरुच राहिला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.