मुंबई: देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयपीओंपैकी एक, पेटीएम (One97 Communications) च्या शेअरच्या किमतीत आज मोठी घसरण झाली आहे. एनएसईवर सकाळी ११:०५ वाजता कंपनीचे शेअर्स ७.८९ टक्क्यांनी घसरून ४९४.४० रुपयांवर व्यवहार करत होते. तर गेल्या २ आठवड्यात पेटीएम शेअरच्या किमती २६ टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. विशेष म्हणजे कंपनीचे शेअर्स त्यांच्या आयपीओ किंमतीपासून ७८ टक्क्यांनी घसरले आहेत. पेटीएमची इश्यू किंमत (Paytm Issue Price) रुपये २१५० होती.

गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान; टाटा समूहाचा हा शेअर १०० रुपयांच्या खाली, किंमत ६६% घसरली
मजबूत कमाईच्या आशेने डिजिटल पेमेंट सेवा देणाऱ्या, पेटीएम, या देशातील आघाडीच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे वाईट दिवस संपताना दिसत नाहीत. देशात १८,३०० कोटी रुपयांचा दुसरा सर्वात मोठा आयपीओ आणलेल्या पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समधील घसरण कधी थांबेल हे सांगणे कठीण आहे. पेटीएमच्या शेअर्सने मंगळवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली.

विदेशी गुंतवणूकदारांची कमाईची चाल; १० शेअर्सवर लाखो कोटी गुंतवले, तुमच्याकडे आहेत का?
शेअरचा भाव रु. ५०० च्या खाली
आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात सपाट सुरुवात झाली. दरम्यान, पेटीएमच्या शेअर्समध्ये सुरुवातीपासूनच घसरण दिसून आली. सकाळी १०.३० वाजेपर्यंत कंपनीचे शेअर्स ७.८६ टक्के किंवा ४२.२० रुपयांनी घसरले आणि ५०० रुपयांच्या खाली आले. तर सध्या शेअर्स ४९४.८० रुपयांवर व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या ट्रेडिंग दरम्यान पेटीएमचे शेअर्स एका वेळी ४८६ रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. दुपारी १२.१५ पर्यंत पेटीएमचे शेअर ९.०८ टक्क्यांनी घसरून ४८८.२५ रुपयांवर व्यवहार करत होते.

गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान! यंदा लिस्टींग झालेल्या IPOनी लाखो कोटी बुडवले
गेल्या आठवड्यातही शेअर कोसळला
गेल्या आठवड्यात ब्लॉक डीलची बातमी आल्यानंतरही पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशनचे शेअर्स विकण्यासाठी तुटून पडले. जपानी सॉफ्टबँक समूह कंपनीचे २ कोटी ९० लाख शेअर्स सुमारे १७५० कोटी रुपयांना विकण्याच्या तयारीत असल्याची बातमी येताच शेअर बाजारात पेटीएमचे शेअर्स ९.३२ टक्क्यांनी घसरले आणि ५४५.४० रुपयांच्या पातळीवर पोहोचले.

शेअरची किंमत कुठून कुठे पोहोचली?
पेटीएम आयपीओचा इश्यू साईझ १८,३०० कोटी रुपये होता आणि त्यासाठी किंमत २०८० ते २१५० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली होती. या आयपीओला गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिला, पण सवलतीच्या दरात लिस्टिंग झाल्यापासून कंपनीला शेअर्सच्या घसरणीतून अद्यापही सावरता आले नाही. पेटीएमचे स्टॉक नोव्हेंबर २०२१ मध्ये शेअर बाजारात ९ टक्के सूट देऊन १,९५० रुपयांवर सूचीबद्ध झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here