बुलडाणा : खामगाव तालुक्यातील शिरला मन नदीत आज सकाळी एका २३ वर्षीय तरुणीचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा खून की आत्महत्या याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
कदाचित अज्ञात इसमाने तिचा खून करून तिचा मृतदेह पाण्यात फेकून दिला असावा ? असा संशय व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पथक घटना ठिकाणी आले आहे. घटनेची माहितीचे गांभीर्य लक्षात घेता विभागाचे पोलीस अधिकारी अमोल कोळी घटनास्थळी दाखल झाले आहे तर घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.