Crime News: उत्तराखंडच्या पित्तोरागढमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नेपाळवरून आलेल्या एका व्यक्तीनं त्याच्या दोन वर्षीय भाच्याची निर्घृणपणे हत्या केली. चिमुकल्याच्या आजोबांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र माथेफिरु मानानं त्यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला. त्यात आजोबा गंभीर जखमी झाले. मृताच्या आईनं एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतलं आणि कसाबसा आपला जीव वाचवला.

 

small kid
उत्तराखंडच्या पित्तोरागढमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नेपाळवरून आलेल्या एका व्यक्तीनं त्याच्या दोन वर्षीय भाच्याची निर्घृणपणे हत्या केली. चिमुकल्याच्या आजोबांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र माथेफिरु मानानं त्यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला. त्यात आजोबा गंभीर जखमी झाले. मृताच्या आईनं एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतलं आणि कसाबसा आपला जीव वाचवला.

धारचुलाच्या गरगुवा गावात हा प्रकार घडला. आई बाळाला उन्हात मालीश करत असताना तिचा भाऊ तिथे आला. त्यानं धारदार शस्त्रानं भाच्याची मान कापली. वंश असं भाच्याचं नाव होतं. भावाचं सैतानी कृत्यू पाहून आईनं आरडाओरडा केला. घरात असलेल्या आजोबांनी नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र मामानं त्यांच्यावरही हल्ला केला. त्यात आजोबांच्या हाताची दोन बोटं कापली गेली. घटना घडली त्यावेळी वंशचे वडील रमेश सिंह कुवर जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेले होते.
श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती; प्रेयसीच्या लग्नाबद्दल समजताच शारजावरून आला, वाद घातला अन्…
घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी आरोपीला अटक केली. त्याची चौकशी सुरू आहे. अशा प्रकारचा हल्ला का केला याचा तपास पोलीस करत आहेत. जखमी झालेल्या आजोबांवर सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना हायर सेंटरला हलवण्यात आलं. आरोपी तरुणानं धारदार शस्त्रानं स्वत:च्या भाच्याचा खून केल्याचं पोलीस ठाण्याचे प्रभारी कुवर सिंह रावत यांनी सांगितलं. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here