आग्रा: उत्तर प्रदेशच्या दोन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आलं आहे. दोघांच्या खाते अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश एसएसपींनी दिले आहेत. यातील पहिलं प्रकरण गुन्हेगारी गुप्तचर खात्यात कार्यरत असलेला शिपाई मोहम्मद रियाझशी संबंधित आहे. तर दुसरं प्रकरण पोलीस लाईनमध्ये कर्तव्यावर असलेल्या विरेंद्रशी निगडीत आहे.

मोहम्मद रियाझचे एत्माद्दौला परिसरात राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल पतीला संशय आला. स्पेशल ड्युटीवर जात असल्याचं सांगून रियाझ घरी परत यायचा नाही. रियाझच्या स्पेशल ड्युटींचं प्रमाण वाढू लागलं. त्यामुळे पत्नीचा संशय बळावला. तिनं पतीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याचा पाठलाग करू लागली.
नेपाळवरून आलेल्या मामाचा चिमुकल्या भाच्यासोबत भयंकर प्रकार; आजोबा वाचवण्यासाठी धावले, पण…
रियाझचा गुपचूप पाठलाग करता करता पत्नी त्याच्या प्रेयसीच्या घरापर्यंत पोहोचली. तिनं घराचा दरवाजा वाजवला. तेव्हा आतमध्ये रियाझ दारु पित होता. पत्नीला पाहून त्याला धक्का बसला. पत्नी घरात घुसली आणि दोघांना बेदम मारहाण केली. तिनं पोलिसांना फोन केला. रियाझची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तो मद्याच्या अमलाखाली असल्याचं अहवालातून स्पष्ट झालं.

एसएसपींनी या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेतली. त्यांनी शिपाई मोहम्मद रियाझला निलंबित केलं. सध्या या प्रकरणाची संपूर्ण पोलीस दलात चर्चा सुरू आहे. रियाझसोबतच पोलीस लाईनमध्ये तैनात असलेला शिपाई विरेंद्रलादेखील निलंबित करण्यात आलं आहे. विरेंद्रनं खोटं बोलून आपल्याशी प्रेमसंबंध ठेवल्याचा आरोप एका महिलेनं केला. तक्रार घेऊन महिला आग्र्याच्या एसएसपींकडे पोहोचली.
संपूर्ण कुटुंब संपलं; पती, पत्नी अन् ४ मुलांचा संशयास्पद शेवट; ‘त्या’ घरात नेमकं काय घडलं?
दोन वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. प्रकरणाचा तपास करण्यासाठी विरेंद्र घरी यायचा. त्यावेळी त्यानं आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. विरेंद्र विवाहित असल्याचं नंतर मला समजलं. त्यानं ही बाब माझ्यापासून लपवली होती, अशी तक्रार पीडितेनं नोंदवली. त्यानंतर एसएसपी यांनी विरेंद्रला निलंबित केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here