नाशिक : नाशकातील KTHM महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने महाविद्यालयासह हॉस्टेलमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिकच्या गंगापूर रोडवर असलेले हे महाविद्यालय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणातून चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा २१ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यामुळे चर्चेत आले आहे. हा प्रकार समोर येताच महाविद्यालय परीसरात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. (Kthm College In Nashik)

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या KTHM या नामांकित महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये टी वाय बी कॉम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे. गौरव रमेश बोरसे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या डागसौंदाना येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. गौरवने आत्महत्या करून जीवन संपवण्यासारखा निर्णय का घेतला? असा प्रश्न आता महाविद्यालय प्रशासनासह विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना पडला आहे. गौरवने आत्महत्या का केली त्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Tanaji Sawant : राज्यात मुंबई, भिवंडी आणि मालेगाव गोवरचे हॉटस्पॉट, आरोग्यमंत्र्यांची माहिती
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधीलच गौरव राहत असलेल्या रुमच्या शेजारील रूममध्ये राहणारा एक मुलगा इस्त्री मागण्यासाठी गौरवकडे गेला त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

प्राथमिक माहितीनुसार, गौरवने नैराश्यातून आत्महत्या केल्याची हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती. गौरव हा KTHM महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असून तो आपल्या सीए असलेल्या मामाकडे फावल्या वेळात काम करत असल्याची देखील माहिती मिळाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हॉस्टेलमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस येताच ही बाब पोलिसांना कळवण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. गौरव बोरसेने टोकाचे पाऊल उचलून जीवन यात्रा संपवल्याने बोरसे कुटुंबीयावर दु: खाचा डोंगर कोसळला असून महाविद्यालय आणि हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांकडून देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

एकच नंबर ! WhatsApp मध्ये भन्नाट फीचरची एंट्री, कॉलिंगशी संबंधित आहे अपडेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here