मृत सोनू कवर आणि राहुल मीणा यांचे कुटुंबीयदेखील मंदिरात यायचे. मंदिरात दर्शनाला आले असतानाच राहुल आणि सोनू यांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झाले. दोघांच्या विवाहबाह्य संबंधांची कल्पना भालेश कुमारला होती. राहुल आणि त्याच्या पत्नीचे वाद होऊ लागले. वाद संपावेत यासाठी पत्नीनं भालेशसमोर गाऱ्हाण मांडलं. तेव्हा भालेशनं राहुल आणि सोनूच्या संबंधांची माहिती तिला दिली.
विवाहबाह्य संबंधांची माहिती पत्नीला दिल्यानं राहुल आणि सोनू संतापले. त्यांचा भालेशवर राग होता. तुझी बदनामी करू अशी धमकी दोघांनी भालेशला दिली. बदनामी झाल्यास कित्येक वर्षांपासून तयार केलेली भक्तांमधील प्रतिमा डागाळेल अशी भीती भालेशला वाटली. त्यानं दोघांना संपवण्याचा कट रचला. त्यासाठी त्यानं बाजारातून फेविक्वीकची जवळपास ५० पॅकेट्स खरेदी केली.
१५ नोव्हेंबरच्या संध्याकाळी भालेशनं राहुल आणि सोनूला बोलावलं. त्यांना एकांतात घेऊन गेला. दोघे शारीरिक संबंध ठेवत असताना भालेश तिथून दूर गेला. काही वेळातच तो परतला. त्यानं दोघांच्या अंगावर फेविक्वीक टाकलं. दोघांच्या डोळ्यात फेविक्वीक गेल्यानं त्यांच्याकडून प्रतिकार झाला नाही. यानंतर भालेशनं दोघांच्या डोक्यात दगड घातला आणि मग त्यांच्यावर चाकूनं वार केले.