थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका महिलेने शनिवारी १९ नोव्हेबरला पोलिसांत तक्रार दिली. न्यू फ्रेंड्स कॉलनीत त्या कुत्रीला मारून टाकण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत चार आरोपी तरुणांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही विद्यार्थी हे डॉन बॉस्को टेक्निकल इन्स्टिट्युटचे विद्यार्थी आहेत. घटना घडली तेव्हा तयार करण्यात आलेल्या व्हिडिओत १० ते २० लोक दिसत आहेत. हे लोकं टीन शेडमध्ये कुत्रीला मारहाण करत आहेत. यातील काहीजण तर ‘मारा, मारा’ असे ओरडत असल्याचे ऐकू येते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी व्हिडिओ फुटेजची तपासणी करण्यात आली. यात मारहाण करणाऱ्या चार आरोपींची ओळख पटली असून, त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आग्नेय विभागाच्या पोलीस उपायुक्त ईशा पांडे म्हणाल्या की, या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. पोलीस डॉन बास्को टेक्निकल इन्स्टिट्युटमध्ये जाऊन आले. परंतु सुट्या असल्याने तिथे कुणी सापडले नाही. त्यानंतर पोलिसांनी संचालकांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य समजावून सांगितले.
चहावाल्याच्या खांद्यावर हात, ग्रामस्थांशी मनमोकळ्या गप्पा; सत्तारांची टपरीच्या बाकावर ‘चाय पे चर्चा’
पण त्याचवेळी एका व्यक्ती समोर येत तक्रार दिली. मारहाण करणाऱ्या अविनाश मिंज असल्याचं सांगितलं. महाविद्यालयातून याची सर्व माहिती काढून पोलिसांची टीम त्याच्या घरी गेली. पण तो तिथे नव्हता व मोबाईल फोनही स्वीच ऑफ होता. पण नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या माहितीवरुन कुत्रीचे मृत शरीर सापडले. अविनाशसोबत असलेल्या अनीस होरहोरिया, राहुल कुजूर आणि गुरुवचन यांनाही अटक करण्यात आली आहे.